पुणे दि. ०७ :- दौंड प्रशासकिय कार्यालयात तेली समाजाचे व गाथा चे संपादकिय लेखक भगवद् भक्त जय श्री संताजी महाराज जगनाडे महाराजांची छायाचित्र व जी.आर वाटप_आज दि.६ रोजी दौंड येथिल सर्व तेली समाजबांधव व पुणे शहरातील पदाधिकारी यांनी दौंड प्रशासकिय कार्यालय तहसिल ऑफिस,पंचायत समिती,दौंड नगरपरिषद व भुमी आभिलेख येथे मोठ्या प्रमाणात समाजबांधव भगिनी उपस्थित राहुन श्री भगवद् भक्त संताजी जगनाडे महाराजांचे प्रतिमा व शायकिय आदेश(जी आर) वाटप करण्यात आले व सुदुंबर संस्थानचे लेटर हेड वर निवेदन देण्यात आले. त्या निमित्ताने त्यांना ८ डिसेंबर रोजी आपल्या कार्यालयात तसेच शाळा,सर्व शासकिय विभाग या ठिकाणी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी त्याबद्दल अधिकाय्रांनी सर्व विभागांना आदेश द्यावेत.महाराजांच्या कार्याचा शिक्षण क्षेत्रातुन प्रसार करण्याच्या दृष्टिने शाळा महाविद्यालये या ठिकाणी त्यांच्या कार्यावर वकृत्व स्पर्धांच आयोजन करावे.असेही तेली समाज पदाधिकाय्रांकडुन सांगण्यात आले.यावेळे जगनाडे महाराजांचे कार्यावरिल माहितीपर संक्षिप्त स्वरुपात व्याख्यान तालुका अध्यक्ष श्री/कु महेश पांडुरंग देशमाने,पुणे सुदुंबरे पदाधिकारी श्री गंगाधरमामा हाडके व पुणे व दौंड पदाधिकारी श्री गणेश विठ्ठल चव्हाण , यांनी दिले.तसेच सर्व प्रशासकिय कार्यालयात बी डी ओ दौण्ड कडून अद्याआदेश झाले आसुन सर्वांनी याची दखल घ्यावी.तसेच दिनदर्शिकेतही ८ डिसेंबरला *श्री संताजी महाराज* जयंती म्हनुन नमुद करावे.प्रतिमांचे वाटपावेळेस दौंड शहर अध्यक्ष श्री उल्हास आत्माराम पवार,श्री अजय (आबा) मुरलिधर क्षीरसागर, वरवंचे सरपंच श्री संतोष कचरे ,पालखी खजिनदार श्री नारायण क्षीरसागर,श्री भगवानआप्पा लोखंडे,श्री ज्ञानेश्वर सोपानराव क्षीरसागर,श्री.अमोल लोखंडे,श्री मच्छिंद्र देशमाने,श्री जाधवसाहेब,सौ.अरुणा पवार,नगरसेविका सौ.दळवीताई,श्री अभिजित भिसे,श्री अंबादास पवार,
श्री पप्पु लोखंडे,श्री लक्ष्मन लोखंडे हे सर्व समाजबांधव व पदाधिकारी उपस्थित होते.
कु.प्रा.महेश पांडुरंग देशमाने,
देऊळगांव राजे .दौंड.वार्ताहार