मंचर दि २३:- मंचर पेठ-जीवे मारण्याची धमकी देत एक महिन्याभरात मामाने अल्पवयीन भाचीवर चार वेळा लैंगिक अत्याचार, केल्याचा प्रकार पेठ ता. आंबेगाव येथे घडला. याप्रकरणी मंचर पोलिसांनी तुषार रघुनाथ गुंजाळ वय १९ याला रविवारी दि.२२ रोजीअटक केली आहे, माहिती पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.पिडीत मुलीची आई बाहेरगावी असल्याने ती आजी-बाबांसोबत पेठ येथे राहत होती.व पिडीत मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी तुषार गुंजाळ याने एक महिनाभरात चार वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार, केला. तुषार गुंजाळ याच्याकडून होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून तिने घरातील आजोबांना सांगितले व रविवारी आजोबांनी मोबाईलवरुन शंभर नंबर वर फोन करुन पिडीत मुलीने सर्व माहिती पोलिसांना सांगितली.त्यानुसार मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी रामदास तनपुरे, पोलीस पाटील सविता साठे यांनी पिडीत मुलीच्या घरी धाव घेऊन पिडीत मुलीने आजी-आजोबा यांच्यासमोर घडलेला सर्व प्रकार सांगितला.त्यानुसार मंचर पोलिसांनी तुषार रघुनाथ गुंजाळ याच्यावर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे करत आहेत