इंदापूर दि २० :- ( प्रतिनिधी):- इंदापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी तालुक्याचे ठिकाण असलेल्या इंदापूर शहरात अद्यावत पत्रकार भवन उभारण्यासाठी व यासाठी लागणाऱ्या जागेसंदर्भात पूर्ण सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे, तसेच बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना इंदापूर येथिल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते तसेच सचिव सागर शिंदे यांच्या हस्ते नियोजित पत्रकार भवन उभारणीसाठी तसेच पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसंदर्भात लेखी निवेदन(सोमवार ता 20 रोजी) खासदार सुप्रिया सुळे यांना पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात देण्यात आले.यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनिल राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका शाखेला शासनाकडून जागा उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ स्थरावर प्रयत्न करणार असून येथील पत्रकारांना सुख-सुविधा प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.पुणे जिल्हा अधिकारी तसेच वरिष्ठ कार्यालयाकडे तात्काळ जागेसंदर्भात पाठपुरावा करून जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचीही माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
चौकट ;-
पत्रकार भवनासाठी खास निधी उपलब्ध करणार ”
इंदापूर तालुक्यातील पत्रकारांसाठी इंदापूर येथे अध्यावत पत्रकार भवन उभारण्यासाठी डीपीडीसीच्या माध्यमातून निधीची मागणी केली आहे. त्यामुळे अध्यावत पत्रकार भवन उभे राहील अशी माहिती बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी :- बाळासाहेब सुतार