पुणे दि ०२ :- सहकारनगर तळजाई माता वसाहत , पुणे येथील २० ते ३० गाड्यांची तोडफोड केली. यापूर्वी याच ठिकाणी अशी घटना घडून ४० ते ५० गाड्यांची सीट फाडून गाड्यांचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक नागरिक दहशतीखाली आहेत. यामध्ये २ रिक्षा २ लहान टेम्पो आणि २० ते २५ दुचाकींचा समावेश आहे. या घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे सहकारनगरच्या तळजाई टेकडी भागात दि २ रोजी ३ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. गुंडांनी २० ते ३० गाड्या फोडल्या. यामागे नेमकं कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू केला आहे व गुंडांच्या या दहशतीमुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुण्यात वारंवार अशाप्रकारच्या तोडफोड, मारहाण आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत.या परिसरातील काही टोळ्या आपली दहशत निर्माण करण्यासाठी अधूनमधून असे प्रकार करत असल्याचंही बोललं जात आहे. व पुढील तपास पो.उप.निरी.जी एस देव करीत आहे