पुणे दि १७: – पुणे शहरात घरोघरी जाऊन पथकांनी सर्व्हेक्षणाला सुरुवात केली आहे. सद्य:स्थितीत करोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी (कंटेमनमेंट प्लॅन) अंतर्गत करावयाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून सर्व्हेक्षण केले जाणार आहे.
मनपातील विविध अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश या पथकात आहे. यामध्ये आरोग्य निरीक्षक, समूह संघटिका, विभागीय आरोग्य निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी, अशा विविध पदनिहाय कर्मचारी, अधिकारी यांचा समावेश आहे.
तीस कर्मचारी यांचे एक पथक असे सुमारे 125 पथके तयार केली असून, संपूर्ण शहरात विशेषतः ज्या भागात प्रादुर्भाव अथवा परिस्थिती असेल अशा भागांत तसेच गेल्या महिनाभरापासून परदेशातून पुण्यात आलेले देशी-परदेशी नागरिक यांची घरोघरी जाऊन भेटी घेणे, करोना संदर्भात माहिती देणे, करोनाबाबत लक्षणे आढळल्यास, नायडू रुग्णालयात तपासणी करणे, वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन घेणे, विलगीकरण म्हणजे काय, घरी 14 दिवस विलगीकरण कसे करणे, याबाबतचे माहिती दिली जाणार आहे.
याचबरोबर महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजना या सर्व प्रकारच्या बाबतीत माहिती देण्यात येऊन जनजागृती केली जाणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
३८, पथकांच्या वतीने शहराच्या विविध भागांतील ४८२ घरांना भेटी देउन १५७८ , नागरिकांशी संपर्क साधून कोरोना विषयक माहिती देण्यात आली,तसेच विविध उपाययोजना बाबत माहिती देउन मार्गदर्शन करण्यात आले,