पुणे दि २७ : – पुणे शहरात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने अत्यावश्यक सेवा व वस्तू सुरू असताना देखील संचारबंदीचा फायदा घेऊन ७९६ रुपयांचे घरगुती गॅस सिलिंडर १२०० रुपयांना विक्री करत आसताना पुणे शहर खडकी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४६ गॅस जप्त केले आहेत. नरेंद्र रघुवीरसिंग ठाकूर (वय ३१, रा. दापोडी), विजय जीवन मुदलियार (वय ४६), श्रीकांत विश्वासराव पाटील आणि ऋषीकेश श्रीधर भोपटकर (वय 47) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत उपनिरीक्षक अमोल भोसले यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.देशभरात कोरोना आजाराने थैमान घातले आहे यापर्श्वभुवर देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर राज्यात संचारबंदी घातली आहे. सर्व दुकाने, कंपन्या तसेच इतर सेवा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, यातून अत्यावश्यक वस्तू आणि सेवा वगळण्यात आल्या आहेत. यात घरघुती वस्तू, गॅस, अन्यधान्य, मेडिकल सेवा आहेत.मात्र यानंतर देखील खडकी भागात घरघुती गॅसची संचारबंदी काळात चढ्या दराने विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली व .वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत मिसाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री अमोल भोसले , पो . हवा . मुथय्या , पो . हवा भालेराव , पो . शि . जाधव , पो . शि नानापुरे यांचे पथकाने घटनास्थळी पंच व बनावट ग्राहकांसह खडकी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात “ छाजेड पेट्रोल पंपाजवळ , मैलापाणी शुध्दीकरण केंद्र समोर , भाऊ पाटील रोड , बोपोडी पुणे येथे सार्वजनीक रोडलगत दोन छोटे टेम्पो उभे आहेत . त्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर असुन सदर घरगुती गॅस सिलेंडर दोन इसम ग्राहकांना मुळ भाव ७९६ त्यानुसार पोलिसांनी याची बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यावेळी ७९० रुपयांचा गॅस १२०० रुपयाना विक्री केला जात असल्याचे दिसून आले.पोलीस निरीक्षक एस. एस. पठाण आणि उपनिरीक्षक भोसले यांच्या पथकाने खडकीमधील छाजेड पेट्रोल पंपाजवळील भाऊ पाटील रोडवर छापा टाकून गॅसचा काळाबाजार उघडकीस आणला आहे. पोलिसांनी जागीच दोघांना ताब्यात घेतले आहे. तर इतरांचा शोध घेतला जात आहे.भारत गॅस कंपनीचा हा गॅस असून, श्रीकांत पाटील गॅस एजन्सीचे मालक आहेत. तर चालक ऋषीकेश भोपटकर यांच्याशी संगनमताने विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून ४६ गॅस, रोकड आणि तीन चाकी टमटम असा ९७ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत. संचारबंदी कालावधीत नागरिकांची अडवणूककरून कोणी चढ्या दराने वस्तू विक्री करत असल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.