नेवासा,दि.०८:- प्रतिनिधी।मागील वर्षेी अतिवृष्टीने नेवासा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याचे कपाशी,तुर,बाजरी,मका,व फळ बाग या पिकांचे नुकसान झाले होते,सदर पिकांचे मागील वर्षी पंचनामे देखील करण्यात आले होते.अगोदरच पाऊस पडत नसल्याने खचून गेलेला बळीराजा पिकाप्रमाणे अर्धमेला झाला आहे.त्यात उशीरा का होईना बळीराज्याच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत परिसरातील शेतकरी वर्गावर शासनाची कृपा झाली आणि मागील वर्षी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकाची भरपाई मंजूर होऊन ही यादी मध्ये नावे येऊन ही नुकसान भरपाई आली नसून शेतकरी वर्गात नाराजी आहे. नुकसान भरपाई आली नसून त्वरित नुकसान भरपाई जमा करावी अन्यथा नाविलाजास्तव प्रशासनाच्या विरोधात जीवन ज्योत फाऊंडेशन च्या वतीने तहसीलदार कार्यालयात अर्धनग्न अवस्थेत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले आहे.या वेळी खासदार सदाशिव लोखंडे व तहसील यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की मागील वर्षी नुकसान भरपाई नाही आली तर येत्या आठ दिवसात भेंडा या ठिकाणी चक्काजाम व नग्न आंदोलन करण्यात येईल.या वेळी कमलेश नवले,छञपती युवा सेनेचे नरेंद्र नवथर,प्रदिप आरगडे,अक्षय बोधक,राहुल कांगुणे,प्रकाश मुळक,संजय ठुबे,आप्पासाहेब आरगडे,अभिजीत बोधक,शुभम आरगडे(भावड्या),राम आरगडे,संजय ऊरे,राजू गायकवाड,सागर नवथर,निलेश शिंदे,आम आदमी पार्टीचे संदिप आलावणे,करिम सय्यद,कृष्णा आरगडे,अनेक शेतकरी उपस्थित होते.