पुणे,दि.२९ :- पुणे शहरात ढोल ताशा पथक आणि पारंपरिक पद्धतीने पुण्यातल्या पाचही मानाच्या गणरायाला भाविकांनी निरोप दिला. यामध्ये मानाचा पहिला ‘कसबा गणपती’चं ४.३६ मिनिटांनी विसर्जन पार पडलं.
त्यानंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन ५.१२ मिनिटांनी झालं.
तसेच मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन ५.५३ मिनिटांनी
त्यानंतर मानाचा चौथा तुळशीबाग गणपीतीचं विसर्जन ६.३२ वाजता
तर मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचं विसर्जन ६.५९ वाजता पार पडलं.
गुरूवारी सकाळी १० वाजता सुरू झालेली गणेश विसर्जन मिरवणूक शुक्रवारी पर्यंत सुरूच श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंडळाने वेळेत लक्ष्मी रस्ता पार केला.
मात्र त्यानंतर मिरवणूक रेंगाळली. आता बहुधा मिरवणूक पूर्ण व्हायला नेहमी इतकाच वेळ लागेल अशी चिन्हे आहेत.
रात्री १२ वाजता बंद झालेले ध्वनीक्षेपक शुक्रवारी सकाळी बरोबर ६ वाजता सुरू झाले. त्यानंतर पून्हा एकदा लक्ष्मी रस्ता डीजेच्या दणदणाटात घुमू लागला. पोलिसांनी विनंती करूनही मंडळांचे पदाधिकारी खेळ दाखवल्याशिवाय पुढे जायला तयार नव्हते. अखिल मंडई मंडळाचा शारदा गणेश अलका चौक पार झाल्यावर भाविकांच्या गर्दीचा पूर एकदम ओसरला. कार्यकर्त्यांची गर्दी मात्र कायम होती.
सकाळपासून लक्ष्मी, केळकर, कुमठेकर, टिळक या चारही रस्त्यावरून मिरवणुका सुरु. सर्वत्र मोठे मोठे डीजे लावल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून मंडळांना लवकरात लवकर पुढे जाण्याचे आवाहनही केले जात आहे. परंतु मंडळांची संख्या जास्त असल्याने ते शक्य होत नाहीये. तसेच मंडळातील कार्यकर्तेही मिरवणूक पुढे घेऊन जाण्यास विलंब करत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. यंदाही मागच्या वर्षीप्रमाणे रेकॉर्ड ब्रेक मिरवणूक होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.