पुणे,दि.०८:- राज्य उत्पादन शुल्क पथक क्रमांक १ ने कात्रज परिसरात एका लक्झरी बसमधून गोव्यातून आणलेल्या दारू जप्त केला. या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला गोव्यातून पुण्यात दारू ची मोठी तस्करी होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक एस.एल. पाटील यांच्या पथकाने जुना पुणे-सातारा रोडवरील कात्रज परिसरात गस्त घालत असताना भारत पेट्रोल पंपासमोर एक लक्झरी बस अडवल्यी.
तपासणी केल्यावर, त्यांना बॅगपायपर क्लासिक व्हिस्कीच्या 180 सील न केलेल्या बाटल्या (15 बॉक्स) सापडल्या,हि दारू गोव्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे परंतु गोव्यात ती कायदेशीर आहे. जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत 42,लाख 90, हजार रुपये आहे.
गणेश बाळकृष्ण चव्हाण (वय ५०, रा. सिंधुदुर्ग), अक्षय अनंत जाधव (वय ३२, रा. नालासोपारा पश्चिम) आणि उमेश सीताराम चव्हाण (वय ३७ रा . सिंधुदुर्ग) तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई दारूबंदी कायदाअन्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस करत आहे.