पुणे,दि.२२ :- पुणे शहरातील सेनापती बापट रोड येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील पीएमपीएल बस चालकाने १५ गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली. वेताळबाबा चौक जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलजवळ घडली आहे. या चालकाने बेदरकारपणे बस चालवत १५ गाड्यांना उडवले.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सेनापती बापट रोडवर वेताळबाबा चौक येथेजे डब्ल्यू मॅरियट हॉटेलजवळ घडली आहे. एका बसचालकाने १५ वाहनांना उडवल्याची घटना समोर आली आहे.
चालकाचा असा हा अवतार पाहून घाबरलेल्या प्रवाशांनी आणि रस्त्यावरील नागरिकांनी आरडाओरडा करायला सुरूवात केली होती.
प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर देखील चालकाने बस थांबविली नाही. दरम्यान, याप्ररकणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश ज्ञानेश्वर सावंत (31, रा. वारजे माळवाडी, अतुलनगर – याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे यासंदर्भात पोलिस अंमलदार सुशिल सुभाष लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे.शनिवारी सावंत हा त्याच्या ताब्यातील बस पुणे विद्यापीठाच्या दिशेने घेवुन जात होते.
त्यावेळी बस चालकाचा आणि एका कारचालकाचा वाद झाला. त्यानंतर ही घटना घडली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
दरम्यान, पीएमपीएमएल प्रशासनाने चालक सावंत याच्यावर तात्काळ कारवाई करून त्यास कामावरून कमी केले आहे.