पुणे,दि.०२ :- गोव्यातून पुण्यात विक्रीसाठी आणलेला 74 लाख 56, हजार 200 रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. रावेत गावच्या हद्दीत, बंगलोर मुबई हायवेवरतील राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग यांनी सोमवारी (दि. 01) रोजी . पहाटे 04:10 वाजन्याच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावार ही कारवाई केली.
विजय चंद्रकांत चव्हाण वय 53 वर्षे, रा. सातारा व सचिन निवास धोत्रे, बप 31 वर्ष, रा. सांगली या दोन आरोपी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण,व धोत्रे याने अवैधरीत्या गोवा राज्यातून पुण्यात विदेशी मद्यसाठा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणला होता.
याबाबत गोपनीय माहिती मिळाली असता ही कारवाई केली. या वेळी चव्हाण,व धोत्रे हा अवैधरित्या आणलेल्या मद्याची वाहतूक करताना मिळून आला. पोलिसांनी या कारवाईत 74 लाख 56, हजार 200 रुपये किमतीचा मद्यसाठा व भारत बेझ कपनीचा 3723 R या प्रकारच्या 14 चाकी वाहन MH 15 FV 7940 वाहन एकुण रुपये 1, कोटी 19, लाख 92, हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे
या दोन्ही आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ), (ई), 83 व 108 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असुन त्यांना अटक करण्यात आलेली आहे. तसेच त्यांना मा, न्यायालय वडगाव मावळ येथे हजर करण्यात आले असता दि. 04/11/2023 पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे.
सदर कारवाई सर्व दिपक सुपे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एफ विभाग, पुणे, प्रविण शेलार, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सासवड विभाग, पुणे, दु,निरीक्षक राम सुपेकर, बडदे, आशिष जाधव, मोहिते, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, डी.के. पाटील, जवान चावरे, अतुल बारगुळे, तात्या शिंदे, अशोक अदमनकर, गायकवाड तसंच जवान-नि-वाहन चालक अंकुश कांबळे यांनी भाग घेतलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास दिपक सुपे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एफ विभाग, पुणे हे करत आहेत.
कारवाई ही अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांच्या अधिनस्त असलेल्या निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एफ विभाग व सासवड विभाग, पुणे या कार्यालयाने केलेली आहे. या पुढे सुध्दा अवेध मद्य निमिती, वाहतुक व विक्री विरुध्द नियमित कारवाई सुरु राहणार असून पुणे जिल्हयामध्ये कोणत्याही नागरीकास अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्रीबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी टोल फ्री. क्र. 18002339999 व द्रध्वनी क्र. 020-26058633 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्यात यावी असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे चरणसिंग राजपूत यांनी केलेले आहे.