पुणे ग्रामीण,दि.२३ :- पुण्यातील रांजणगाव एमआयडीसी येथील कारेगाव (ता. शिरूर) येथे बेकायदा वास्तव्यास असलेल्या 21 बांगलादेशी नागरीकांना पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये 15 पुरुष, 04 महिला व 02 तृतीयपंथींचा समावेश आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी ही कारवाई केली आहे. आरोपींन कडून 09 जणांकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व 01 इसमाकडे बनावट मतदानकार्ड मिळून आले आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांनी दिली आहे.
अजमुल सरतखान उर्फ हसिफ खान वय -50), मोहम्मद अकबर अजीज अकबर सरदार (वय – 32), शफिकउल अलीमिया शेख (वय- 20), हुसेन मुखिद शेख (वय – 30), तरिकुल अतियार शेख (वय – 38), मोहम्मद उमर फारूखः बाबु उर्फ बाबु बुकतीयार शेख (वय 32), शाहिन शहाजान शेख (वय – 44), मोहम्मद हुसेन शेख (वय – 32), रौफ अकबर दफादार (वय 35), इब्राहिम काजोल शेख (वय 35), फरीद अब्यास शेख वय – 48), मोहम्मद सद्दाम अब्दुल सखावती (वय – 35) मोहम्मद अब्दुल हबीब रहेमान सरदार (वय – 32), आलीमिया तोहकील शेख (वय – 60), मोहम्मद इसराईल फकीर (वय -35), फिरोजा मुताकीन शेख (वय 20), लिपीया हसमुख मुल्ला (वय – 32), सलमा मलीक रोशन मलीक (वय 23), हिना मुल्ला जुल्फोंकार मुल्ला (वय 40), सोनदिप उर्फ काजोल बासुदिप बिशेश (वय 30), येअणुर शहदाता मुल्ला (वय – 25, सर्व सध्या रा. कोरेगाव, ता. शिरुर,जि.पुणे, मुळ रा. बांगलादेश) असे ताब्यात घेण्यात आलेल्या पुरुष व महिलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. 21) दहशतवाद विरोधी शाखेचे पथक रांजणगाव पोलीस स्टेशन परिसरात गस्त घालीत असताना. यावेळी पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विशाल गव्हाणे यांना गोपनीय माहिती मिळाली की, गंजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगावच्या परिसरात काही बांगलादेशी नागरीक हे बेकायदेशीरपणे राहत आहेत. मिळालेली माहिती वरिष्ठांना तसेच गुन्हे अन्वेषण शाखेला दिली. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस स्टाफसह कारेगाव परीसरामध्ये शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत इसमांचा शोध घेतला असता कारेगावच्या हद्दीमध्ये भाड्याने राहण्यास असणारे 15 पुरुष, 04 महिला व 02 तृतीयपंथींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता हे सर्वजण बांगलादेशी नागरीक असुन त्यांनी भारत बांगलादेश सिंमा ओलांडुन कोणताही वैद्य भारतीय पारपत्र परवाना धारण करत नसताना देखील भारतामध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करून महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हयातील कारेगाव (ता. शिरूर) येथे बनावट भारतीय देशाचे आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदानकार्ड धारण करून वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यापैकी 09 इसमांकडे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व 01 इसमाकडे बनावट मतदानकार्ड मिळून आले आहे.
या प्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशनला वरील व्यक्तीच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीतांना शिरुर कोर्टात हजर केले असता कोर्टाने गुरुवारपर्यत (ता. 24) पोलीस कस्टडी दिली आहे. पुढील तपास रांजणगाव MIDC पोलीस करीत आहेत
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग, प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शना खाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहा. फौजदार विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार विशाल भोरडे, रविंद्र जाधव, मौसीन शेख, ओंकार शिंदे, तसेच रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात सहायक फौजदार डी. आर. शिंदे, विजय सरजीने, विलास आंबेकर, उमेश कुतवळ, विद्या बनकर, शितल रौधळ यांचे पथकाने केली आहे.