पुणे,दि.०३ :-औंध परिसरात टोळक्यान कडून दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना पुण्यातील औंधमधील महापालिका वसाहतीत घडली. टाेळक्याने महिलेसह एका तरुणावर शस्त्राने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तोडफोडीत दहा दुचाकी आणि तीन रिक्षांचे नुकसान झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
याप्रकरणी ओंकार नरवडे (वय २०, रा. डाॅ. आंबेडकर वसाहत, ओैंध), पियूष (वय २१), नंदन (दोघे रा. पीएमसी वसाहत, ओैंध), आर्यन माेरे (वय २०, रा. डाॅ. आंबेडकर वसाहत, ओैंध) यांच्यासह आठजणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साहिल संजय पवार (वय २०, रा. डाॅ. आंबेडकर वसाहत, ओैंध) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींचा तक्रारदार साहिल याच्याशी किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. आरोपी महापालिका वसाहतीत आले. त्यांनी साहिल आणि त्याची आई दीपाली यांना शिवीगाळ केली. दीपाली यांना मारहाण करुन त्यांच्यावर वार केले. त्यावेळी भांडणात मध्यस्थी करणाऱ्या सनी सोनवणे याच्यावर आरोपींनी वार केले.
महापालिका वसाहतीच्या आवराता लावलेल्या आठ ते दहा दुचाकींची तोडफोड केली, तसेच तीन रिक्षांच्या काचा फोडून दहशत माजविली. दहशत माजवून आरोपी पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.