पुणे दि ३०:- कोरोना व्हायरसचा फैलाव रोखन्यासाठी संपुर्ण देशात लॉकड़ाऊन करण्यात आले आहे तसेच राज्याच्या जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत व पुणे शहरात संचारबंदी लाग केल्याने शहरातील सर्व कारखाने व काही दुकाने व काम बंद झाल्या आहेत व पुणे शहरात काम करणारे बाहेरील राज्यातील जिल्ह्यातील मजूर , कामगार तसेच वाहने बंद झाल्यामुळे अडकून पडलेले नागरीक यांना सध्या निवारा व अन्नाचे साधन नसल्याने ते गावी जाण्यासाठी रोडवर निघताना दिसून येत आहेत व पोलीस आयुक्त , पुणे शहर डॉ . श्री . के . व्यकंटेशम् यांनी , दिलेल्या सुचनांवरुन वाहतुक शाखेचे अपर पोलीस आयुक्त , डॉ . संजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त , परिमंडळ – २ चे शिरीष सरदेशपांडे , पोलीस उप आयुक्त , परि . १ श्रीमती स्वप्ना गोरे , सहा . पोलीस आयुक्त , रविंद्र रसाळ , वरिष्ठ पोलीस निरीक्षक चुडाप्पा , वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी , शहरातील नाकाबंदी , पेट्रोलिंग करीता नेमण्यात आलेल्या अधिकारी व, कर्मधारी यांना , योग्य त्या सुचना देऊन शहरात रोडवर जे मजूर कामगार बेघर मिळून येत आहेत अशा एकुण ८५९ लोकांना पोलीसांनी पुणे महानगरपालिका कडील ४ निवारा केंद्र व ११ महानगरपालिका शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरुपातील निवारा केंद्र येथे ठेवण्यात आले आहे . सदर निवारा केंद्रावर पुणे महानरपालिका यांनी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी यांना नेमण्यात आले असून दाखल केलेले नागरीक यांना पुणे महानगरपालिकाचे आरोग्य विभागाकडील वैद्यकीय अधिकारी , कर्मचारी यांचेकडून वैद्यकीय तपासणी केलेली आहे . निवारा केंद्रात दाखल केलेल्या नागरीकांना शहरातील सामाजिक संस्था , दानशूर व्यक्ती हे जेवणाची व्यवस्था करण्यास पुढे आले असून त्यांचे मार्फतीने जेवणाची व्यवस्था केली जात आहे . लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये , कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता पुणे शहर पोलीस दलाकड़न विशेष खबरदारी घेण्यात येत आहे . शहरात २४ तास नाकेबंदी व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . शहरात नाकाबंदी पॉईंट नेमण्यात आले आहेत नागरीकांना पीए सिस्टीमद्वारे प्रबोधन करण्यात येत आहे . अनावश्यकपणे फिरणाऱ्या वर कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जात आहे . तरी पुणे शहरात जे बेघर नागरीक मिळून येत आहेत त्यांचे जेवणाची व्यवस्था सेवाभावनेने करण्याकरीता शहरातील सामाजिक संस्था , दानशूर व्यक्ती यांना पुढे येण्याचे पुणे पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येत आहे .