नीरा नरसिंहपुर दि १ :- कोरोना व्हायरसच्या संकटामुळे चाकाटी तालुका इंदापूर येथील गावामध्ये गोरगरीब भूमिहीन नागरिकांना म्हणजे ज्या लोकांना जमिनी नाही कष्ट करून स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काम करतात या लोकांसाठी इंदापूर तालुका मार्केट कमिटीचे चेअरमन आप्पासाहेब जगदाळे यांनी,एक मदतीचा हात पुढे करुन, गोरगरीब जनतेसाठी अन्न धान्य व किराणामालाचे वाटप केले. गहू दोन किलो तांदूळ तीन किलो साखर चार किलो मटकी दोन किलो बटाटा पाच किलो या प्रकारे प्रत्येक गरीब नागरिकांना वाटप करण्यात आले गोर गरिबांचा कैवारी अन्नदाता म्हणून नाव असलेले आप्पासाहेब जगदाळे यांच्या नावाची ओळख संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये असल्याचेही येथील नागरिक बोलत होते चाकाटी वि.का.सोसायटी चेअरमन/ मा. सरपंच रामभाऊ पाटील, मा.सरपंच मोहन आबा मारकड, बापुराव बंडगर, ग्रामसेवक स्वप्नील गायकवाड , सरपंच महेंद्र कांबळे, उपसरपंच किसनराव पाटील, सोपान मारकड , नारायण घोडके, मधुकर घोडके व तसेच चाकाटी ग्रामस्थ उपस्थित होते चाकाटी येथील ग्रामस्थांनी अप्पासाहेब जगदाळे यांचे मनःपूर्वक आभार मानले व अन्नधान्य मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला
निरा प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार