पुणे दि ०३ :- कोरोना महामारीस प्रतिबंधासाठी श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रधानमंत्री सहाय्यता निधी साठी तीन लाख एकावन्न हजार तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी दोन लाख बावन्न हजार ,विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांना धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आले.या प्रसंगी ट्रस्टी अशोकभाई शाह,भरतभाई शाह,शैलेश गुजर,राजीव शाह,आदी मान्यवर उपस्थित होते.
