• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

खबरदार पुणे परिसरात बंदच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तुंची चढया दराने विक्री केल्या तर पुणे शहर पोलिसांचा दुकानदारांवर  वॉच

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
02/04/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०३ ;- कोरोना – विषाणु या संसर्गजन्यचा महाराष्ट्रात , तसेच देशात झपटयाने प्रसार होत असल्याने , त्यास प्रतिबंध व्हावा म्हणुन , केंद्र सरकार व राज्य सरकारने सर्व देशात व राज्यात दि१४ एप्रिल पर्यत व्यवहार बंद करुन संचारबंदी लागु केली आहे . सदर संचारबंदीचा काही व्यापारी दुकानदार गैरफायदा घेवुन , जीवनावश्यक वस्तूंची कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी दैनंदिन ठरवुन दिलेल्या जीवनावश्यक वस्तुंचे किंमती पेक्षा चढया दराने विक्री करुन स्वतःचे आर्थिक फायदया करीत सामान्य जनते कडुन पैसे उकळणा – या दुकानदार व्यापा – या विरुध्द कडक कारवाई करणे पुणे शहर वरिष्ठांनी गुन्हे शाखेस सुचना दिल्या होत्या व . युनिट १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व कर्मचारी यांनी दि २७/३ रोजी युनिट १ कडील अधिकारी व कर्मचारी यांनी अचानक छापा टाकून होम लिंक एंटरप्रायजेसचा मालक भुपेश ओमप्रकाश गुप्ता व २ ) रोहन अजय शुक्ला , ऑफीसबॉय , रा पिंगळे वस्ती , मुंढवा रोड , सांडभोर वस्ती , पुणे यांचे विरुध्द समर्थ पोलीस ठाणे येथे गु . र . नं . ९२ / २०२० , जीवनाश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३ सह ७ व भादंविक – ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . व त्यांचेकडून एकुण कि . रु . ४ , ३० , ४४५ / – किंमतीचे १७ , ८०५ मास्क जप्त केले होते व अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक , पुर्व विभाग , गुन्हे शाखा पुणे शहर यांनी दिनांक ३१/०३ रोजी चर्तुःशृंगी पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात बाणेर पुणे येथे दुकानदार नामे पन्नाराम पुनाजी चौधरी , वय ४३ वर्षे रा . फ्लॅट नंबर १०५ अविष्कार बिल्डींग बालेवाडी पुणे हा त्याचे पंचरत्न सुपर मार्केट बाणेर रोड बाणेर पुणे या दुकानातुन शेंगदाणे १८० रुपये किलो तुरडाळ १६० रुपये किलो , मुगडाळ १५५ रुपये किलो , चनाडाळ १४० रुपये किलो , खोबरे २८० रुपये किलो , शाबुदाणा १३५ रुपये किलो , साखर ४८ रुपये या भावाने विक्री करीत असताना मिळून आला . तसेच दिनांक ०१ /०४ रोजी खडकी पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात खडकी बाजार पुणे येथे इसम नामे गौरव राजेंद्र अगरवाल , वय २८ वर्षे रा . घर नंबर २२ , नवा बाजार , गांधी चौक , खडकी पुणे – ३ हा त्याचे बी एम बगरवाल किराणा जनरल स्टोर्स , नवा बाजार , खडकी , पुणे या किरकोळ किराणा भुसार दुकानात शेंगदाणे १४० रुपये किलो गोटा खोबरे २२० रुपये किलो , या भावाने विक्री करीत असताना मिळुन आला . नमुद दोन्ही दुकानदारांवर जीवनावश्यक वस्तु कायदा कलम ३ व ७ प्रमाणे कायदेशिर कारवाई करुन चर्तुःशृंगी पो स्टे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व खडकी पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . युनिट – ०४ गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व कर्मचारी कारवाई करणेकामी चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड व सहाय्यक उपनिरीक्षक अब्दुलकरीम सय्यद यांना माहिती मिळाली की . सागर पार्क लेन नं . ०२ , वडगावशेरी या ठिकाणी एक गॅस एजन्सी धारक हा आदेश झुगारून ७९६ / रुपयाचा घरगुती गॅस सिलेंडर हा १००० / – रुपये अशा चढया दराने विक्री करीत आहे , अशी माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा , युनिट – ०४ चे पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड , सहाय्यक उपनिरीक्षक अब्दुलकरीम सय्यद , पोलीस कर्मचारी सुरेंद्र साबळे चंदननगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विवेक सिसाळ पोलीस कर्मचारी मोहन वाळके , आबा गावडे , दिपक चव्हाण , शकूर पठाण व अन्न पुरवठा व वितरण अधिकारी प्रशांत खताळ असे पथक तयार करून डमी कस्टमर पाठवून अमित गॅस एजन्सी , सागर पार्क लेन नं . ०२ , वडगावशेरी या ठिकाणी छापा टाकला असता एजन्सी धारक नामे अमित सुगंधचंद गोयल , वय – ३० वर्षे , रा . फ्लॅट नं . ए / ९०१ , पीटी कोडियाड सोसायटी , सुंदराबाई शाळेजवळ , चंदननगर हा भारत गॅस एच पी गॅस इंडेन गॅस या कंपनीचा कोणताही परवानगी नसताना बेकायदेशीर रित्या गॅस सिलेंडरचा साठा करताना व ७९६ / – रुपयांचा घरगुती गॅस सिलेंडर हा १००० / – रुपयांस विक्री करीत असताना मिळून आल्याने त्याचे कब्जातून एकूण – १६ भरलेले घरगुती गॅस सिलेंडर ( भारत गॅस कंपनीचे – ०२ , एच पी कंपनीचे – ०५ , इंडेन कंपनीचे – ०९ ) व ०२ रिकामे सिलेंडर ( भारत गॅस कंपनीचे ) , रोख रक्कम व भारत गॅस कंपनीचे व एच पी गॅस कंपनीचे एकूण ४८ विविध ग्राहंकाचे उपभोक्ता कार्ड असा एकूण – ३३७३६ / – रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून नमूद आरोपीविरुध्द मा . जिल्हाधिकारी यांनी काढलेले आदेश झुगारून अत्यावश्यक वस्तुचा साठा व चढया दराने विक्री तसेच स्फोटक पदार्थ हाताळणेबाबत निष्काळजीपण दाखविलेने आरोपी नामे अमित सुगंधचंद गोयल , वय – ३० वर्षे , रा . फ्लॅट नं . ए / ९०१ , पीटी कोडियाड सोसायटी , सुंदराबाई शाळे जवळ , चंदननगर याचेविरुध्द चंदननगर पोलीस स्टेशन दाखल करण्यात आला आहे व अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम – ३ , ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक , पश्चिम विभाग , गुन्हे शाखा पुणे शहर यांनी दि . ३१/३ रोजी सौ . प्राजक्ता प्रकाश माळी , अन्न व पुरवठा निरीक्षक , ग परिमंडळ विभाग पुणे शहर यांचेसह । गायकवाड , पो . हवा . वांजळे , गायकवाड , गुरव असे विश्रामबाग पो . स्टे . चे कार्यक्षेत्रात फिरुन माहिती घेत असताना अग्रज फूड प्रोसेसर , टिळकरोड , महाराष्ट्र मंडळाजवळ , पुणे या दुकानात जावून दुकानाचे मालक बाळकृष्ण दिगंबर थत्ते रा . १५३५ सदाशिव पेठ , महाराष्ट्र मंडळाजवळ , पूणे यांचेकडुन जिवनावश्यक वस्तु मधील साखर ५५ रुपये किलो , शाबूदाणा १६० रुपये किलो , शेंगदाणा २०० रुपये किलो , तुरडाळ १५० रुपये किलो , मसुरडाळ २०० रुपये किलो या किंमतीने वाजवी पेक्षा जास्त दराने विक्री करीत असल्याचे मिळून आल्याने त्यांचेवर सौ . प्राजक्ता प्रकाश माळी , अन्न व पुरवठा निरीक्षक , ग परिमंडळ विभाग पुणे शहर यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन विश्रामबाग गुन्हा दाखल करण्यात आला आहे व १८०० / – रुपये किंमतीच्या वरील जिवनावश्यक वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत . सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त , गुन्हे अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे बच्चनसिंग , सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे प्रतिबंधक शिवाजी पवार , सहा पो आयुक्त , अभियोग विजय चौधरी, यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक पर्व विभाग , पश्चिम विभाग . यनिट १ . यनिट ४ गन्हे शाखा पुणे शहर कडील वपोनि अरुण वायकर पोलीस पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते , निरीक्षक विजय टिकोळे , पोलीस निरीक्षक अंजुम बागवान सहा पो निरीक्षक बापु रायकर , पोलीस उप निरी . संजय गायकवाड , विजय झंजाड , विवेक सिसाळ पोलीस हनुमंत शिंदे व उत्तम बुदगुडे स . पो . फौज . अब्दुलकरीम सय्यद कर्मचारी अविनाश शिंदे , दिलीप जोशी , प्रविण शिर्के , मोहन साळवी , अर्जुन दिवेकर , सुशिल काकडे , प्रफुल्ल साबळे , मनोज साळुके , विशाल शिंदे , सचिन चंदन , अमित छडीदार बाबा चव्हाण , अनिल घाडगे , प्रकाश लोखंडे , योगेश जगताप , मल्लीकार्जून स्वामी , श्रीकांत वाघवले , इरफान मोमीन , सुभाष पिंगळे , रिजवान जिनेडी , सुधाकर माने , गजानन सोनुने , अजय थोरात , अमोल पवार , संजय बरकडे , सचिन जाधव , इम्रान शेख , तुषार खडके , अशोक माने , विजेसींग वसावे , प्रशांत गायकवाड , अजय जाधव , उमेश काटे , प्रविण जाधव , तुषार माळवदकर , पांडुरंग वांजळे , हनुमंत गायकवाड , विजय गुरव सुरेंद्र साबळे , संदिप मुंढे , दिपक चव्हाण , मोहन वाळके आबा गावडे , शकूर पठाण व अन्न पुरवठा व वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी केली आहे .

Previous Post

दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे १०० तृतीयपंथीयांना धान्य

Next Post

पुणे सांगवी परिसरात महिलेच्या छेडछाडीवरुन सुरक्षा रक्षकाचा खून

Next Post

पुणे सांगवी परिसरात महिलेच्या छेडछाडीवरुन सुरक्षा रक्षकाचा खून

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist