पिंपरी चिंचवड दि ०३ – महिलेची छेड काढल्यावरून बेदम मारहाण केलेल्या सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मुंबईत मृत्यू झाला. मारहाण पुणे सांगवी येथे 10 मार्च 2020 रोजी झाल्याने नवी मुंबई येथील तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो पिंपरी चिंचवड मधील सांगवी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.दाखल गुन्ह्यातील फिर्यादी मयत दुखी नवलसिंग थापा हा दि १८/०३/२०२० रोजी प्रथम तळोजा येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते व सदरठिकाणी त्यास २ ते ३ अनोळखी इसमांनी बांबुने मारहाण केली होती . याबाबत भोईवाडा मुंबई पोलिसांना खोटी माहिती दिलेली होती . दुखी नवलसिंग थापा याचेवर प्रथम दि . १९/०३ /२०२० रोजी मुंब्रा येथील खाजगी रूग्णालयामध्ये उपचार करण्यात आले होते . त्याची प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्यास पुढील उपचाराकरिता केईएम हॉस्पीटल मुंबई येथे अॅडमिट करण्यात आले होते . तेथे उपचारादरम्यान | दि . २१ / ०३ / २०२० रोजी ०२ . ४५ वा . तो मयत झाल्याने भोईवाडा पोलीस ठाणे मुंबई येथे ०० / २०२० सीआरपीसी १७४ प्रमाणे मयत नोंद करून पुढील कार्यवाही साठी तळोजा पोलीस स्टेशन , नवी मुंबई येथेदि . २२ / ०३ / २०२० रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली . गुन्ह्याचे फिर्यादी कडे केलेल्या फेरचौकशीतील तपासात व मयत दुखी याचे मोबाईल क्रमांकाचे सीडीआर याप्रमाणे केले तपासा दुखी नवलसिंग थापा असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र गजेंद्र थापा (22, रा. मुंब्रा कौसा, जि. ठाणे. मूळ रा. नेपाळ) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुखी याला त्याचे काका प्रकाश उर्फ अजय थापा यांनी पुणे नवी सांगवी पिंपरी चिंचवड येथील एका बंगल्याचे ठिकाणी वॉचमन म्हणून नोकरीस लावले होते . दि . १० / ०३ / २०२० रोजी मयत दुखी थापा याने कामाचे ठिकाणी दारूचे सेवन करून तेथील एका चाळीतील माहिलेची छेड काढली होती त्यामुळे सदर परिसरातील युवकांनी त्यास मारहाण केली होती . त्यानंतर त्यास त्याचे बंगल्याचे मालकाने देखील बांबुने मारहाण केली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने .
मारहाणीनंतर दुखी 18 मार्च रोजी तळोजा येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला. तिथे त्याने स्थानिक पोलिसांना चुकीची माहिती दिली की, तळोजा येथे त्याला 2-3 इसमांनी मारहाण केली. दुखी याच्यावर 19 मार्च रोजी मुंब्रा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार केले. मात्र, त्याची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला मुंबई मधील केईएम रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान त्याचा 21 मार्च रोजी दुपारी मृत्यू झाला. याबाबत तळोजा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास केला.तळोजा पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात दुखी हा घटनेच्या दिवशी तळोजा येथे नसून तो पिंपरी चिंचवड मधील सांगवी परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पुढील तपासासाठी गुन्हा सांगवी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. व पुढीलतपास वपोनी. साबळे सांगवी पोलीस करत आहेत.