पुणे दि१८ : – भाजीपाला बाजार खडकी येथील उपबाजार उद्यापासून पुन्हा बंद करण्यात येनार आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. बाजाराच्या परिसरात करोनाग्रस्त रुग्णआढळून आल्याने पोलीस व कॅन्टोन्मेंट प्रशासनाने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.आहे जीवनावश्यक वस्तू असलेला भाजीपाला बाजार सुरळीत व्हावा यासाठी पोलीस, कॅन्टोन्मेंटचे अधिकारी व बाजार समिती यांमध्ये नुकतीच बैठक पार पडली
यावेळी करोनाग्रस्त भागातील नागरिकांना बाजार आवारात प्रवेश न देता बाजार आवार सुरू करण्याच्या सूचना बाजार समितीच्या वतीने करण्यात आल्या. मात्र, पोलीस व कॅन्टोन्मेंट प्रशासन बाजार बंद ठेवण्याच्या भुमिकेवर ठाम आहे. याबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना कळविण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले
मोशी भाजीपाला व फळे बाजारात प्रचंड गर्दी
मोशी पालेभाज्या उपबाजारात शुक्रवारी चालू झाल्यापासून प्रचंड गर्दी पाहण्यात मिळत आहे व कोणतीही न डिस्टन ठेवता पालेभाज्या घेण्यासाठी प्रत्येक स्टॉलवर गर्दी दिसून येत आहे
व चढ्या भावाने भाजीपाला विकताना दिसून येत आहे आमच्या प्रतिनिधीने शुक्रवारी रात्री बारा ते सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान केलेल्या सर्व्हेमध्ये कोणतेही नागरिक नियमाचे पालन न करता फक्त भाजी आपल्याला कशी मिळेल याकडे लक्ष केंद्रित करताना दिसून येत होते वतेच फायदा घेऊन काही व्यापारी चढ्या भावाने भाजी विकताना दिसत होते तर मेथी 40 रूपये एक गडी तर कोथिंबीर चाळीस रुपये एक गडी तर कांदा पोते अठराशे रुपये बटाटा पंचवीस रुपये टमाटा क्रेट पाचशे रुपये तर इतर
भाजीपाला चढ्या भावाने विकताना पाहण्यात मिळत होते व काही व्यापारी तोंडाला मास्क न लावता व कोणते हि डिस्टन न ठेवता भाजी पाला विकताना व घेताना पाहण्यात मिळते होतेे शनिवारी (दि. 18) मोशी उपबाजारात 126 वाहनांमधून चार हजार 100 क्विंटल शेतमालाची आवक झाली. मांजरी उपबाजारात 110 वाहनांतून २ हजार क्विंटल तर उत्तम नगर उपबाजारात 10 गाड्यांमधून 130 क्विंटल शेतमाल विक्रीसाठी दाखल झाला. पुणे क्रुषी उत्पन्न बाजार समितीच्या मोशी, मांजरी आणि उत्तम नगर या तीन उपबाजारात मिळून 246 वाहनांमधून 6 हजार 230 क्विंटल शेतमालाची आवक झाल्याचे सांगण्यात आले.