पुणे दि १८ :-ससून हॉस्पिटल चा कायापालट करण्यात आणि रुग्णसेवाना प्रभावी मानवी चेहरा देण्याचे महत्वपूर्ण काम करणाऱ्या डॉ अजय चंदनवाले यांची बदली अन्यायकारक असून ती रद्द करण्यात यावी अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट ,प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.ससून हॉस्पिटल हे गोरगरिबांवर उपचार करणारे हॉस्पिटल आहे. तेथे आधुनिक उपचार साधने उपलब्ध करणे ,निधी उपलब्ध करणे,आणि डॉक्टर -कर्मचाऱ्यांची सशक्त टीम उभारण्याचे काम डॉ अजय चंदनवाले यांनी केले. राजकीय कारणांकरिता त्यांचा ससून हॉस्पिटल चा पदभार काढून घेण्यास आमचा विरोध आहे,असे संजय आल्हाट यांनी या पत्रकात म्हटले आहे.कोरोनाच्या काळात गोरगरीब जनतेला ससून हॉस्पिटल मध्ये मिळणारी सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी डॉ चंदनवाले यांना पुन्हा सन्मानाने जबाबदारी द्यावी ,असेही या पत्रकात म्हटले