पुणे दि ०७ :- कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेतर्गत पुणे मनपाचे वतीने विविध उपाययोजना अंमलबजावणी करण्यात येत आहेत,
शहरातील दाट वस्ती व झोपडपट्टी परिसर,रेड झोन मधील नागरिकांचे वैद्यकीय तपासणी करिता खाजगी डॉक्टरांनी मनपास सहकार्य करण्याचे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी आवाहन केले होते,
सदर आवाहनास अनुसरून शहरातील डॉक्टरांनी उस्फूर्तपणे या तपासणीकरिता विनामोबदला पुणे महापालिकेस सहकार्य करण्यात येईल असे सांगितले,
यासंदर्भात पुणे मनपाच्या मुख्य सभागृहात बैठकीचे आयोजन मा,रुबल अगरवाल यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते,
सदर बैठकीस जनरल प्रॅक्टिश नर्स असोसियशन संघटनेच्या अध्यक्षा डॉ,रूपा अगरवाल व इतर पदाधिकारी,आरोग्यप्रमुख डॉ,रामचंद्र हंकारे, सहाययक आरोग्यप्रमुख डॉ,अंजली साबणे,डॉ,कल्पना बलिवंत,डॉ,वैशाली जाधव,डॉ,मनीषा नाईक,सर्व डॉक्टर्स,क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी,विभागीय वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते,
प्रतिबंधित क्षेत्र,रेड झोन परिसरातील व नजीकच्या भागातील डॉक्टरांच्या साहाय्याने येथील भागातील वैद्यकीय तपासणी करणे,
यास्तव या भागातील डॉक्टरांनी मनपाच्या साहाय्याने आपले दवाखाने सुरू ठेवून कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णाणच्या आजारांवर उपचार करणे, व या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नां बाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली,
मनपाच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांनी या भागातील अर्थात भवानी पेठ,शिवाजीनगर घोले रस्ता,कसबा विश्रामबागवाडा, ढोले पाटील रस्ता, येरवडा क्षेत्रीय कार्यालय या भागातील डॉक्टरांची यादी करणे,सहभागी डॉक्टर्स यांना औषधे,वैद्यकीय साधन सामुग्री वितरित करणे,व संपूर्ण नियोजन करणे अशी कामे केली जातील,बैठकीत सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आरोग्यप्रमुख डॉ,रामचंद्र हंकारे यांनी केले,