पुणे, दि.१७ – पुण्यात नवीन वर्षाच्या सुरुवात १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांनी हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्तांनी १ जानेवारीपासून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही अनेकदा पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र पोलीस आयुक्तांनी नव्याने हा निर्णय घेतला आहे. याआधीही पुण्यात हेल्मेटसक्ती कऱण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र प्रशासनाला नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागले होते. ठिकठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यांवर उतरुन निर्णयाचा निषेध केला होता.