पुणे दि ०४ :- पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याचे काम जवळपास ७०% टक्के पूर्ण झाले आहे. तर १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल, असा दावा पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात आला आहे.या दरम्यान या पूल पाडण्यातून सुमारे 18 हजार मेट्रिक टन एवढा राडारोडा तयार होणार असून त्याचा रस्त्याचे बेस कोट आणि पेव्हर ब्लॉकसाठी देखील पुनर्वापर करण्याचे नियोजन टाटा-सिमेन्स कंपनीकडून करण्यात आले आहे. शिवाजीनगर ते
हिंजवडी दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएकडून हाती घेण्यात आले आहे.व मेट्रो मार्ग विद्यापीठ चौकातून जाणार आहे. संपूर्ण मार्ग इलेव्हेटेड असल्यामुळे विद्यापीठ चौकातील पूल त्याला अडथळा ठरत होता.व त्यामुळे हे पूल पाडण्यास महापालिका आणि राज्य सरकारने परवानगी दिली होती. त्यानुसार पूल पाडण्याचे काम टाटा-सिमेन्स या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून गेल्या महिन्यात 13 जुलैपासून पूल पाडण्यास सुरवात केली होती.व आतापर्यंत पूल पाडण्याचे काम जवळपास ७०% टक्के झाले आहे.व येत्या १४ ऑगस्टपर्यंत १००% टक्के काम पूर्ण करण्याचे नियोजन या कंपनीकडून करण्यात आले असल्याची माहिती पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.आहे