पुणे दि १५ :- ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी सकाळी १० वाजता पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे वतीने काँग्रेस भवन पुणे येथे रमेश बागवे अध्यक्ष पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या शुभहस्ते ध्वज वंदन पार पडले, ध्वजवंदन ऋषिकेश शिंदे यांनी घेतले त्या वेळी ध्वजवंदनाची पूर्ण तयारी प्रकाश पवार अध्यक्ष काँग्रेस शहर जिल्हा सेवादल यांचे आधिपत्याखाली सेवादल कार्यकर्त्यांच्या सहकार्याने यशस्वी रित्या संपन्न झाले
त्यावेळी गीत तुकडी चे विशेष सहाय्य लाभले त्यात श्रीमती रंजना ताई राजपूत, सौ मंगला ताई संसारे, सौ विना ताई कदम यांचा सहभाग होता कार्यक्रमास सर्व सर अर्जुन लोनंदकर, संजय शेजवळ, राजू डोडमनी, अशोक चव्हाण, शंकर वाणी, योसेफ बालिद, शशी बीबवे, सुरेश उकिरडे इ. ची उपस्थिती होते१५ ऑगस्ट २०२० स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून पुणे शहर जिल्हा काँग्रेस सेवादल चे वतीने शहर स्तरावर रक्षाबंधन चा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता ते वेळी बहुसंख्येने सेवादल महिला पुरुष सेवादल कार्यकर्ते उपस्थित होते