पिंपरी चिंचवड दि ०३ :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत केलेल्या विविध उपायोजना व कामकाजाचा आढावा घेण्यासाठी खासदार शरद पवार यांनी कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या वॉररूमला भेट दिली. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर उपमहापौर तुषार हिंगे, नगरसदस्य योगेश बहल, राजू मिसाळ, डब्बू आसवानी, मयूर कलाटे, नगरसदस्या मंगला कदम, वैशाली घोडेकर, वैशाली काळभोर, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघेरे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आदी उपस्थित होते