पुणे ग्रामीण दि ०४ :- अवैध पद्धतीने गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर भिगवण पोलीसांनी गुरुवार दि.०३ रोजी भादलवाडी, इंदापूर,पुणे.परिसरात पकडला असून, ७६ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी भिगवण पोलीसांनी चार आरोपी न वर गुन्हा दाखल करण्यात आला असून, भिगवण पोलीसांनी कारवाई केली आहे. भिगवण पोलिसांनी दिलेली महिती नुसार चालक करमहुसेनपिता हसनरजा चौधरी ( वय.३३ रा.मुडीला ता. मेहदावल, जि. संतकबीरनगर उत्तर प्रदेश), शहजाद तुफेल खान, शादाब तुफेल खान दोघे ( रा. कोढवा पोलीस स्टेशन मागे पुणे), माल पुरवणारा अनोळखी पुरवठादारासह गुटखा उत्पादक एच. आय तांबोळी अँड सन्स ( रा. यरनाळ,ता. चिकोडी,जि. बेळगाव, कर्नाटक) यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिनियम २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहन चालक करमहुसेनपिता हसनरजा चौधरी यास अटक करण्यात आली आहे दि.०३ रोजी दु. १२ वाजण्याच्या सुमारास पोलीस नाईक इन्कलाब पठाण हे पुणे सोलापूर हायवे रोडवर पेट्रोलिंग करीत असताना भादलवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे येथे एक कंटेनर के.ए.२२ डी.२२७४ हा सोलापूरहून पुणे च्या दिशेने चालला होता. त्यावेळी पोलीसांना या कंटेनरचा संशय आल्याने त्यांनी सदर कंटेनरचा पाठलाग करून त्यास पकडले व तपासणी केली असता कंटेनरमध्ये ४५ लाख ५३ हजार सातशे साठ रुपयांचा हिरा पान मसाला, १० लाख ७१ हजार रुपयांचा रॉयल पान मसाला आढळुन आला. पोलिसांनी ५६ लाख २४ हजार सातशे साठ रुपयांचा गुठखा व २० लाख रुपयांचा कंटेनर असा एकुण ७६ लाख २४ हजार सातशे साठ रुपयांचा माल जप्त केला आहे.राज्य शासनाने विविध प्रकारच्या तंबाखूजन्य गुटखा विक्रीवर राज्यात बंदी घातली आहे. त्यानंतर देखील राज्यात तंबाखूमिश्रित गुटख्यांची राजरोसपने विक्री होत असल्याचे भिगवण पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून समोर आलं आहे. या मोठ्या कारवाईबद्दल पोलीस दलातील वरिष्ठांसह नागरिकांकडूनही भिगवण पोलीसांचे कौतुक होत आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील, बारामती अप्पर पोलिस अधिक्षक प्रदीप मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने, पोलिस उपनिरीक्षक रियाज शेख, पोलिस नाईक इन्कलाब पठाण व भिगवण पोलिसांनी केली.आहे