पुणे दि ०५ : -पुणे बिबवेवाडी परिसरात एका तरुणाला मारहाण करत किराणा दुकान व कार वर दगडफेक करत दोन तरुणांनी दहशत पसरवण्याचे घटना घडली. या दोघांना पोलिसांनी अटक केली.आहे रोहित चंद्रकांत जानराव (वय २१,रा. शेळके वस्ती, बिबवेवाडी), अमन संजय दिवेकर (वय १९,रा. बालाजीनगर, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अक्षय गरड (वय २०,रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी भागातील खडकेवस्ती परिसरात पहाटे चारच्या सुमारास जानराव आणि दिवेकर आले. आरोपींचा फिर्यादी गरड याच्याबरोबर वाद झाला होता.या कारणावरुन दोघांनी गरडला मारहाण केली. तसेच या दोघांनी या भागातील आदिश्री किराणा विक्रीच्या दुकानावर दगडफेक केली. तेथील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. तर परशुराम भिसे यांच्या मोटारीवर दगडफेक करून काच फोडली. ही माहिती मिळताच पोलिसांनी दोघाना पकडले. अधिक तपास पोलीस हवालदार एम. एम. तांबोळी करत आहेत.