नांदेड दि ०५ :- हदगाव तालुक्यातील मौजे मालेगाव येथील कर्तव्यदक्ष पो . पाटिल दिगांबरराव मेघश्याम कदम यांची अखिल विश्व वारकरी परिषदेच्या नांदेड जिल्हाअध्यक्षपदी सर्वानुमते व बिनविरोध निवड करण्यात आली . वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करन्यासाठी व समाजप्रबोधनाच्या माध्यमातुन मानव जातीचे कल्यान व्हावे हा हेतु डोळ्यासमोर ठेवुन हि परिषद कार्य करते . आजपर्यन्तच्या काळात दिगांबरराव कदम यांनी या परिषदेच्या माध्यमातुन वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करन्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले या हेतुने अखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष ह.भ.प श्री नितीनजी सातपुते आणि मराठवाडा संघटक ह भ प श्री माधवराव सावंत महाराज यांन निवड केली..या त्यांच्या निवडीमुळे दै.आजचा लोकप्रश्नचे विशेष प्रतिनिधी दिपकराव सुर्यवंशी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
नांदेड प्रतिनिधी संदीप तुपकरी