पिंपरी चिंचवड दि १४ : -पुणे तळेगाव परिसरात सासरच्या लोकानच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. १३) दुपारी तीन वाजता तपोधाम कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली.
रोहिणी श्रीपाद तेलगावकर (वय २४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. नंदिनी व्यंकटराव तेलगावकर (गायकवाड), व्यंकटराव तेलगावकर, श्रीपाद व्यंकटराव तेलगावकर (सर्व रा. एक नंबर चौक, लातूर एमआयडीसी शेजारी, लातूर) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वडील श्रीमंत माधवराव धुमाळ (वय ५५, रा. महादेवनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१९ मध्ये रोहिणी आणि आरोपी श्रीपाद यांचा विवाह झाला होता.विवाहानंतर चार महिन्यांनी आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेला त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरहून टीव्ही, फ्रीज व इतर संसारिक साहित्य आणून देण्याची मागणी आरोपींनी केली.तसेच वारंवार पैसे आणण्याची मागणी करून रोहिणी यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. रविवारी दुपारी तीन वाजता रोहिणी यांनी तळेगाव येथील राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.