• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुण्यातील उद्योगपती विजय पुसाळकर यांच्या तर्फे ‘पुणे शहर पोलीस दल कल्याण’ साठी ५० लाख रूपयांचा धनादेश हस्तांतरीत !

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
14/09/2020
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न !

पोलिस दलातील कुटूंबातील पाच मुलींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी विजय पुसाळकर यांच्या ट्रस्ट तर्फे घेणार असल्याचे जाहीर !

पुणे, दि १४ :- सप्टेंबरः संपूर्ण जगाला हादरवून टाकणार्‍या कोविड-१९ महारोगाच्या संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता, अविरत कार्य करणार्‍या पोलीस दलाप्रति कृतज्ञता व्यक्त करताना, त्यांना व त्यांच्या कुटूंबीयांसाठी छोटीशी मदत म्हणून पुण्यातील नामवंत उद्योगपती व इंडो शॉट्ले ऑटो पार्ट प्रा.लि.चे अध्यक्ष विजय बी. पुसाळकर यांनी ५० लाख रूपयांचा धनादेश ‘पुणे शहर पोलीस दल कल्याण’साठी आज रोजी हस्तांतरीत केला. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या उपस्थितीत पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. वैंकटेशम् यांच्याकडे हा धनादेश हस्तांतरीत करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विकास काकतकर, संघटनेचे समिती सदस्य कुमार ताम्हाणे, पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, पुणे शहर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पुर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त श्री. नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) मितेश घट्टे, पोलीस आयुक्त – पंकज देशमुख, सुहास बावचे, संभाजी कदम, पोर्णिमा गायकवाड आणि शिरीष सरदेशपांडे आदि मान्यवर अधिकारी उपस्थित होते. कोविड सुरक्षा नियमांचे संपूर्ण पालन करत हा धनादेश हस्तांतरणाचा कार्यक्रम पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडला.

कार्यक्रमामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना विजय बी. पुसाळकर म्हणाले की, देशामध्ये कोविड-१९ या महामारीने न-भुतो न-भविष्यती अशी परिस्थिती निर्माण केली आहे. अशा अवघड आणि कठीण प्रसंगातही पोलीस दल हे आपली जबाबदारी पार पाडतच असून त्यांनी त्यापुढेही जाऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. आपले जीव धोक्यात येत असतानाही त्यांनी बजावलेली चोख कामगिरी ही वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या याच धैर्य आणि शौर्य कार्यासाठी माझ्या तर्फे ही मी छोटीशी मदत करत आहे. पुणे शहर पोलीस दल कल्याणासाठी ५० लाख रूपयांचा निधी देत आहे. याबरोबर पोलीस दलातील पाच मुलींच्या पदवी पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्या ट्रस्ट तर्फे मी घेत असल्याचेही जाहीर केले.

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल म्हणाले की, करोना महामारीच्या काळामध्ये पोलीस दलाने विविध परिस्थितींचा सामना केला. यामध्ये वेगळ्या प्रकारची संचारबंदी, लॉकडाऊन अशा काळात पोलीस दलाने कर्तव्य बजावताना सामाजिक बांधिलकीची जबाबदारीपण बजावली.

पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. वैंकटेशम् यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले की, समाजातील सगज नागरिक हा सुध्दा एक पोलीसच असतो. विविध सामाजिक आपत्तीमध्ये पोलीस दल सर्तक राहून नागरिकांचे रक्षण करत असतात. विजय पुसाळकर यांच्यासारख्या सामाजिक बांधिलकी जपणार्‍या उद्योगपतींकडून पोलीस दलाला मिळलेल्या या मदतीसाठी मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी जो निधी दिला आहे त्याचा दलाच्या कल्याणासाठी सुयोग्य वापर करण्यात येईल.

श्री. विजय पुसाळकर यांना पोलीस दलाच्यावतीने स्मृतिचिन्ह राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या हस्ते देण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना आणि पुणे शहारामध्ये कोविड-१९ या संकटकाळामध्ये पोलीस दलाने कशाप्रशारे अहोरात्र कार्य केले याचा आढावा अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) अशोक मोराळे यांनी सादर केला. सुत्रसंचालन पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) मितेश घट्टे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी मानले.

Previous Post

महेश कोठारेंना विधानपरिषदेवर संधी द्या – ‘सलाम पुणे ‘ची राज्यपालांकडे मागणी

Next Post

सासरच्या लोकानाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

Next Post

सासरच्या लोकानाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist