पुणे दि १४ :- हुकूमशाही केंद्र सरकार विरूध्द शेतकरी बचाव डिजिटल रॅलीचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार उद्या पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शहरभर राबविण्यात येणार आहे. यामध्ये काँग्रेस भवनमध्ये मुख्य डिजिटल रॅलीचे आयोजन तसेच पुणे कॅन्टोंन्मेट विधानसभा मतदार संघ प्रभाग क्र. १९, पर्वती विधानसभा मतदार संघ, हडपसर विधानसभा मतदार संघ, कोथरूड विधानसभा मतदार संघ, वडगांवशेरी विधानसभा मतदार संघ, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ, कसबा विधानसभा मतदार संघात प्रोजेक्टर लावून या डिजिटल रॅलीचे प्रक्षेपन सायं. ४.०० वा., सर्व ठिकाणी केले जाणार आहे, तसेच पुणे शहर काँग्रेसचे पाच फ्रंटल अध्यक्ष, १२ ब्लॉक अध्यक्ष व सेलचे प्रमुख या डिजिटल रॅलीचे प्रक्षेपण आपापल्या भागात करणार आहेत. पुणे शहरातील सर्व वॉर्डामध्ये शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिम राबविली जाणार आहे.अशी माहिती पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. रमेश बागवे यांनी या पत्रकाद्वारे दिली आहे.