पुणे दि २२ :-पुणे शहर परिसरात गुन्हेगारी काही दिवसात वाढलेली दिसून येत आहे ताजे उदाहरण म्हणजे पुणे औंध परिसरात झालेल्या एक पोलिस कर्मचार्याच्या भावाने मर्डर केला व दुसऱ्यादिवशी मयत मित्राचा काही मित्रांनी बदला घेण्यासाठी त्याच्या भावावर खुनी हल्ला करून हाफ मर्डर ह्यातून पुणे शहरातील काही गॅंग डोके वर काढण्याची भूमिका दिसून येत आहे तर पुणे शहरात दारू गुटका गांजा व मटका फॉरेनच्या सिगारेट व वेश्याव्यवसाय येही खुलेआम चालू होताना दिसत आहे व पुणे शहरात पान टपरी च्या नावाखाली गुटका गांजा व इतर दोन नंबर धंदे पुणे शहरात चालू झालेले दिसत आहे व पुणे शहरात काही ठिकाणी हॉटेल रात्री 2 पर्यंत चालू असताना दिसत आहे काही दिवसापूर्वी डॉ.के.व्यंकटेश आयुक्त यांची बदली झाल्यामुळे काही दोन नंबर धंदे वाले यांनी पुणे शहरात जंगी पार्टी करून आनंद उत्सव साजरा केला व नवीन आयुक्त यांना कोठे काय चालतं हे माहीत नसल्यामुळे काही गुन्हेगार व दोन नंबर धंदेवाले याचा फायदा घेत जुने धंदे जैसे ते परत चालू करून एक पोलीस प्रशासनाला चॅलेंज देत डोके वर काढण्याचा प्रयत्न चालू असल्याचे पुणे शहरात दिसून येत आहे व काही पोलीस अधिकाऱ्यांनाही व कर्मचाऱ्यांना हे दिसून येत असून सुद्धा कानाडोळा करून तेथे दुर्लक्ष करताना हे चालले ते चालून द्या असे बघ्याची भूमिका काही पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाहण्यास मिळत आहे तरी योग्य ती कारवाई करून जर आत्ताचा नाही आळा घातला तर डॉ.के. व्यंकटेशम आयुक्त यांनी पुणे क्लीन केलेली महीनत हि वाया जाणार आहे व पुढे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता व दोन नंबर वाली परत जैसे थे हे दिसण्याची शक्यता काही पुणे कर नागरिकांमधून चर्चा होताना पुणे शहरात दिसून येत आहे