पुणे, दिनांक 22- पुणे जिल्ह्यात कोविडबाबत विविध माध्यमांद्वारे व्यापक प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या. आज ‘पुण्याचा निर्धार- कोविड हद्दपार’ कृती दलाचा विभागीय आयुक्त राव यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपायुक्त संजयसिंग चव्हाण, माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहीनकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, डॉ. शंकर मुगावे, पूर्णिका चिकरमाने, डॉ. रितू परचुरे, डॉ. ज्ञानेश्वर मोटे, डॉ. अभय शुक्ला, आशीष अगरवाल आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त राव म्हणाले, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. या मोहिमेला सहाय्य होण्यासाठी ‘पुण्याचा निर्धार- कोविड हद्दपार’ कृती दलाची मदत होत आहे. पुणे महापालिका तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात वॉर्डनिहाय माहिती-शिक्षण-संवाद (आयइसी) उपक्रम राबविण्यात यावेत. यासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करुन दिला जाईल. ट्वीटर, यू ट्यूब, फेसबुक यासारख्या सोशल मिडीयाचाही संदेश प्रसारणासाठी वापर केला जावा. होर्डींग्ज, पोस्टर्स, हस्
माजी आरोग्य महासंचालक व कृती दलाचे प्रमुख डॉ. सुभाष साळुंके यांनी प्रारंभी कृती दलाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती दिली.