पुणे दि २२ :- पुणे विधानपरिषद पदवी धर मतदार संघातील मतदारांची यादी तयार करण्याच्या ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी दूर करा, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भात मा.पाटील यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.या निवेदनात मा.पाटील यांनी म्हटले आहे की, पदवीधर मतदारसंघाच्या मतदार ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी दूर न करताच निवडणूक घेण्याची तयारी सुरू आहे.या बाबीकडे राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष यापूर्वीच वेधण्यात आले होते.ऑनलाईन भरलेले अर्ज नाकारले जाणे अशा अनेक तक्रारी मतदारांनी केल्या आहेत.त्याच बरोबर सर्व्हर यंत्रणा काम करत नसल्यानेही या प्रक्रियेत अनेक अडचणी येत असल्याने ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी देण्यात यावी.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती हे मा.पाटील यांच्या समवेत उपस्थित होते.