पुणे ग्रामीण दि २० :- दौंड तालुक्यातील यवत परिसरात गावठी पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या युवकास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या टीमने जेरबंद केले आहे . मिळालेल्या माहितीनुसार दि .19 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या टीम यवत पोलिस स्टेशन हद्दीत एका फरारी आरोपीचा शोध घेत असताना भुलेशवर फाटा येथे एक इसम गावठी पिस्तुल स्वतः जवळ बाळगून एक मोटार सायकल घेऊन वारंवार फिरत असल्याचे समजले . या माहितीवरून सदर ठिकाणी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून संशयित फिरणाऱ्याइसमास त्याच्या गाडीसह ताब्यात घेतले . सदर इसमाची अंग झडती घेतली असता त्याच्या कंबरेला मागील बाजूस पॅन्टच्या आत एक लोखंडी वस्तू खोचलेली मिळून आली सदर ची वस्तू ही बाहेर काढून पहिली असता ते गावठी बनावटीचे पिस्तुल असल्याचे समजले सदर इसमास नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव इम्रान बूरहान पिंजारी वय 23 वर्षे रा आव्हाळ वाडी रोड वाघोली ता हवेली जि पुणे मूळ रा देगलूर नाका नांदेड जि नांदेड असे सांगितले वरील इसमास त्याचे गाडी सहित ताब्यात घेऊन यवत पोलिस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) मु पो का क १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरच्या एसमकडून खालिल मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.१) ४० हजार रुपये किंमतीचे लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल २) २० हजार रुपये किंमतीची एक काळ्या रंगाची लाल पट्टे असलेली बजाज कंपनीची मोटार सायकल
एकूण ६० हजार किंमतीच्या मुद्देमाल सह आरोपीला अटक केले व पुढील तपासकामी यवत पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे .सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख सो, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,पो हवा अनिल काळे,पो हवा रविराज कोकरे,पो हवा काशीनाथ राजपुरे,पो ना विजय कांचन,
पो ना अभिजित एकशिंगे, पो कॉ धिरज जाधव यवत पो स्टे चे asi जगताप पो कॉ तानाजी साबळे पो कॉ किरण तुपे,पो कॉ विजय आव्हाळे यांनी केली आहे.