पुणे दि २८ :- पुणे परिसरात शंभर पेक्षा जास्त घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगारास चतुःश्रृंगी पोलीस पोलीसांनी अटक केले आहे त्याच्याकडून ७ लाख २० हजार रूपये चा मुद्देमाल जप्त करून ०३ युनिट गुन्हे शाखा यांनी उघडकीस आणले आहेत . चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक प्रेम वाघमोरे व तपासपथकातील स्टाफ असे घर फोडी गुन्हयाबाबत माहिती काढत असताना पोलीस उप निरीक्षक प्रेम वाघमोरे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , रेकॉर्डवरील घरफोडी करणारा गुन्हेगार नामे जयवंत ऊर्फ जयडया गोवर्धन गायकवाड वय ३२ वर्षे रा, डी.पी.रोड , आंबेडकर वसाहत , औंध पुणे याने फेब्रुवारी २०२० मध्ये शासकीय तंत्रनिकेतन कर्मचारी वसाहत गणेशखिंड रोड पुणे येथे घरफोडी चोरी केली आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर महिती नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे , पंकज देशमुख , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ पुणे शहर , सहा.पोलीस आयुक्त , रमेश गलांडे यांना देवून त्यांनी केलेल्या सुचना प्रमाणे अनिल शेवाळे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रेम वाघमोरे , अमंलदार सारस साळवी , ज्ञानेश्वर मुळे , संतोष जाधव , तेजस चोपडे यांची टिम तयार करून त्यांनी सदर आरोपीस मा.न्यायालयाचे परवानगीने येरवडा कारागृहातून ताब्यात घेवून सदर आरोपीस चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. या गुन्हयात अटक करून आरोपीकडून गुन्हा उघउकीस आलेले आहेत आरोपीकडून १५३ ग्रॅम सोन्याचे दागिने , असा एकूण ७,लाख २०,हजार रूपयाचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक प्रेम वाघमोरे हे करीत आहेत .