पुणे दि २९ :- पुणे खडकी परीसरात संपत्तीच्या वादातून मुलाने वडिलांवर केला चाकू हल्ला करुन जखमी केले. त्यानंतर सुनेने सासूला दांडक्याने मारहाण करून फ्रॅक्चर केले आहे. ही घटना पुणे परीसरात खडकीतील गवळीवाडी जुनी तालीमशेजारी घडली.आहे कपिल पुरणचंद आहेर (वय 36) आणि निशा कपिल आहेर (वय 30) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पुरणचंद आहेर (वय 68, रा. खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आहेर कुटुंबीय खडकीतील गवळीवाडी जुनी तालिम परिसरात राहायला आहेत. काही महिन्यांपासून मुलगा कपिल आणि वडिल पुरणचंद यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू आहेत.दरम्यान, आहेर यांच्या राहत्या घराशेजारी कडबाकुट्टी कापणी मशीन असून त्याठिकाणी पुरणचंद यांना गायीचा गोठा करायचा होता. त्यासाठी त्यांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे कापणी मशीन काढण्यासाठी अर्ज केला होता. त्याची माहिती कपिलला मिळाल्यामुळे त्याने वडिलांवर चाकू हल्ला करून जखमी केले. त्याशिवाय निशा यांनी पुरणचंद यांच्या पत्नीला दांडक्याने मारहाण करून जखमी केले.संपत्तीच्या वादातून मुलाने वडिलांवर चाकू हल्ला करून जखमी केले आहे. त्याशिवाय सुनेने सासूला दांडक्याने मारहाण करून फ्रॅक्चर केले आहे. अधिक तपास – संभाजी तांबे, पोलीस उपनिरीक्षक, खडकी पोलीस ठाणे हे करीत आहे