पुणे दि २०:- महाराष्ट्र अथलेटिक्स संघटनेचे २०२० ते २०२४ च्या मुदतीसाठी आज दि २० रोजी निवडणूक संपन्न झाली असून संघटनेच्या अध्यक्षपदी ऑलिपियन व अर्जुन पुरस्कार विजेता . आदिल सुमारीवाला , सचिव पदी . सतीश उचिल , खजिनदारपदी . माधव शेजूळ तसेच ऍड . अभय छाजेड है चेरमन पदी बिनविरोध निवडून आले . व निवडून आलेल्या कार्यकारिणीची. दि .१ डिसेंबर रोजी महाराष्ट्र अथलेटिक्स संघटनेच्या कार्यकारणी सभेमध्ये २०२० ते २०२४ या कालावधीसाठी निवडणूक घेण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला होता . सदर निवडणुकीसाठी . सुनील शिंदे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती . महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या मार्फत दि . ७ डिसेंबर २०२० पर्यंत प्रतिनिधींची नवे मागविण्यात आली . दि . ८ डिसेंबर २०२० रोजी पात्र सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली . दि . ९ डिसेंबर २०२० ते १३ डिसेंबर २०२० या कालावधीत पात्र यादीतून यादी मधून नामनिर्देशन पत्र मागविण्यात आल्या . दि . १८ डिसेंबर २०२० पर्यंत माघारिचा कालावधी होता . या कालावधीत निर्देशित पदांपेक्षा जास्त उमेदवार न आल्याने सदरची निवडणूक बिन विरोध झाली असल्याचे निवडणूक अधिकारी . सुनील शिंदे यांनी कळविले . आज दि .२० डिसेंबर रोजीच्या सर्व साधारण सभेमध्ये घटने प्रमाणे निवडून आलेल्या कार्यकारणीची नावे जाहीर केली . तसेच ऑलिम्पियन – ललिता बाबर , रचिता मिस्त्री , आनंद मेनेझिस व होमीयर मिस्त्री आणि गुरबन्स कौर यांच्यासारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी घटनेनुसार विविध अनिवार्य समित्यांचे अध्यक्ष म्हणून कामगिरी देऊन या परिषदेचा एक भाग बनविला आहे . सदर प्रसंगी भारतीय अॅथलेटिक्स महासंघाचे प्रतिनिधी . मधुकांत पाठक तर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस. बाळासाहेब लांडगे हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते .