पुणे दि ३०: – शिर्डी पोलीसांच्या ताब्यातुन पळुन गेलेला आरोपीला स्वारगेट पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे पोशि व संदीप साळवे पोशि असे स्वारगेट पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी अटक केली. ही कारवाई घोडेवाला कॉलनी समोर सहकारनगर पुणे येथे जावुन आरोपीस शिताफिने पकडण्यात आले आहे आरोपीवर शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा दाखल होता. व त्या आरोपीला उपचारासाठी ससून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होते
सदर आरोपी हा दिनांक २९ / ०१ / २०२१ रोजी पहाटे ०४/३० वा.ते ०५/३० वा.चे दरम्यान ससुन हॉस्पिटल वॉर्ड नं .१५ मधुन पळुन गेला होता.व गुन्हयामधील पळुन गेलेला आरोपी नामे समीर अक्रम शेख , वय -२४ वर्षे रा.म्हेजे वस्ती , शनी चौक राहता.ता राहता जि.अहमदनगर हा पुणे सहकारनगर भाग -१ पुणे येथे आला असलेबाबत खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाल्याने सदर गुन्हयाचा तपास करीत असताना स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक.बाळासाहेब कोपनर व .सोमनाथ जाधव पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) पुणे यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे पोशि व संदीप साळवे पोशि यांनी गोपनीय बातमीदारामार्फत प्राप्त माहीतीद्वारे घोडेवाला कॉलनी समोर सहकारनगर पुणे येथे जावुन आरोपीस शिताफिने पकडण्यात आले. सदर कामगिरी हि.संजय शिंदे सो अप्पर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर ,सागर पाटील , पोलीस उपआयुक्त परिमंडळ -२ पुणे , सर्जेराव बाबर सहा.पोलीस आयुक्त , स्वागेट विभाग , स्वारगेट पोलीस स्टेशनचे.बाळासाहेब कोपनर वरिष्ठ पोलीस निरीक्षक.सोमनाथ जाधव पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनाखाली , सपोनि अमोल रसाळ , पोउपनि.सुरेश जायभाय , पोहवा सचिन कदम , पोना विजय कुंभार , पोना विजय खोमणे , पोशि सोमनाथ कांबळे , संदीप साळवे , ज्ञाना बडे , मनोज भोकरे , सचिन दळवी , लखन ढावरे , ऋषिकेश तिटमे , वैभव शितकाल , शंकर गायकवाड यांचे पथकाने केलेली आहे .