संगमेश्वर दि ०२ :- तालुक्यातील आरवली मुरडव कुंभारखाणी कुचांबे राजिवली येडगेवाडी प्रमुख जिल्हा मार्ग क्र.४४ मधील कुंभारखाणी बु! येथील ५० च्या दशकातील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु होते या पुलाच्या दुरुस्तीचे काम कडवई येथील ठेकेदाराकडे देण्यात आले होते. मागील एक महीन्यापासून पुलाचे दुरुस्तीचे काम करण्यात येत होते यादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी पाहणी करण्यात येत होती मात्र २ फेब्रुवारी रोजी सकाळी येडगेवाडी – चिपळूण व येडगेवाडी – माखजन या वस्तीच्या दोन बस या पुलावरुन गेल्यानंतर पुलाच्या मधल्या पायाचा भाग ढासळल्याचे दिसून आले.पुलाच्या मधल्या पायाचा भाग ढासळला असला तरी सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही सध्या या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली असून तात्पुरता पर्यायी रस्ता तयार करुन वाहतूक वळविण्यात आली आहे सकाळी ही घटना निदर्शनास येताच कुंभारखाणी गावचे पोलिस पाटील यांनी संगमेश्वर तहसीलदार सुहास थोरात व संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदयकुमार झावरे यांना दुरध्वनीद्वारे कळविले संगमेश्वर तहसीलदार यांनी माहीती घेण्यासाठी तातडीने तलाठी यांना पाचारण केले तर सदर ठिकाणी वाहतूकीचा खोळंबा होवू नये म्हणून वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी संगमेश्वर पोलिस ठाण्याचे कडवई बीट अंमलदार राजेंद्र जाधव व स्वप्निल जाधव उपस्थित होते.
पुल ढासळल्याची माहीती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देवरुख उपविभागीय अभियंता पुजा इंगवले व शाखा अभियंता प्रमोद भारती हे घटनास्थळी दाखल झाले आणि ढासळलेल्या पुलाची पाहणी केली. ढासळलेल्या पुलाची दुरुस्ती करण्याऐवजी नव्याने पुल बांधण्याच्या सुचना स्थानिकांनी मांडलेल्या तर या मार्गावरील सर्व पुलांचे स्ट्रक्टरल ऑडिट करण्याची मागणी केली त्यानुसार उपविभागीय अभियंता पुजा इंगवले, शाखा अभियंता प्रमोद भारती यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत कुंभारखाणी ते कुचांबे दरम्यानच्या पुलांची पाहणी केली आवश्यक असलेल्या मो-या पावसाळपुर्वी बांधून देण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या पाहणी दौऱ्यादरम्यान मांडली यावेळी या पाहणी दरम्यान जि.प सदस्य संतोष थेराडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे, सा.बां शाखा अभियंता विकास देसाई,अक्षय बोरसे,इश्वर बामणे, ग्रा.पं सदस्य दिलीप सुर्वे, पोलिस पाटील राकेश सुर्वे, विनायक सुर्वे, सुनिल सुर्वे, सिध्दांत येडगे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
रत्नागिरी प्रतिनिधी :- संतोष येडगे