पुणे ग्रामीण दि ०२ :- सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्याचे अध्यक्ष धनंजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली बारामती येथे पुणे ग्रामीण चे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर यांचे अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.सदर सभेस संघटणेचे राज्याचे ऊपाध्यक्ष सोपानराव महांगडे सर्व संघटणेचे राज्याचे सचिव संपतराव जाधव यांनी हजर राहुन संघटणेणे कोरोना सारख्या महाभयंकर संसर्ग रोगातही सभासदांच्या केलेल्या कामाची सविस्तर माहीती देण्यातआली .संघटणेचे पदाधिकारी यांनी सभासदांचा सातव्या वेतनाचा प्रश्न, तिन आश्वासित योजनेचा प्रश्न, संगणन परीक्षा पास असणेचा प्रश्न, हवालदार यांचा शंभर रूपये ग्रेड पेचा फरकाचा प्रश्न, पडताळणी साठी येत असलेल्या अडचणी,जुन मध्ये सेवानिवृत झालेल्या बांधवांना जुलैची वेतन वाढ देण्यात यावी या बाबतचा प्रश्न, सेवानिवृत्तीचे नंतर सेवाकाळात दिलेले जादा रक्कम सेवानिवृती नंतर वजा करू नये या बाबतचा प्रश्न ,ट्रेझरी मध्ये बिले पास होणेस होनारा विलंभचा प्रश्न, सेवानिवृत्तीचे नंतर ऊशिरा पेशन मिळत असलेचा प्रश्न, सातव्या वेतनाचे फरकाचे लाभापासुन वंचित ठेवलेचा प्रश्न या सह अनेक ज्वलंत प्रश्न संघटणेणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री , गृहमंत्री पोलीस महासंचालक विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेटुन सोडवण्यात आले. या बाबतची माहीती सविस्तर माहिती सभेमध्ये ऊपाध्यश सोपानराव महांगडे व राज्याचे सचिव संपत जाधव सो यांनी दिली..
संघटनेणे महाराष्ट्र राज्यातील सर्व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या ज्वलंत 41प्रश्नाचे निवेदन यापूर्वी.अनिल देशमुख गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री.अजितदादा पवार साहेब व. पोलिस महासंचालक यांना दिलेले असुन त्या पैकी सेवानिवृती नंतर मोफत वैद्यकीय सुविधा व सेवानिवृत बांधवाचे मुलांना भरतीमध्ये 25%आरक्षण , सातव्या वेतनाचे फरकाचे सर्व लाभ लवकर मिळणेसाठी जानता राजा सन्माननीय शरदचंद्रजी पवार यांना हजोरो लोकांचे उपस्थितीत निवेदन देण्याचा व चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचा निर्णय सभेत घेणेत आला . पोलीस हे नेहभीच बारातासापेक्षा जादा काम करतात संपुर्ण सेवाकाळात आपली निम्मी सेवा ते ईतर सरकारी नोकरापेक्षा जादा देतात या जादा कामामुळे पोलीसांना ऊच्चरक्तदाब, मधुमेह ,हुदयरोग, या सारखा असंख्य रोगाला सामोरे जावे लागते. पवार पोलीसांचे प्रश्नाची चांगली जान आहे . पवार बारामती येथे भेटीची वेळ घेऊन फेब्रुवारी महीन्यात हजारोचे संखेणे शांततेत निवेदन देण्याचा निर्णय बारामतीचे सभेत घेण्यात आला . पवार यांना पोलीसाच्या प्रश्नाची जान असलेणे निश्चित ते मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख यांचेशी संपर्क साधुन सेवानिवृत पोलीसांचे प्रश्न सोडवतील असा आत्मविश्वासही सर्व सभासदांनी व्यक्त केला .बारामतीचे सभेचे वेळी 75 नविन सभासदांनी सभासद नोंदणी केली. .तसेच सर्व सभासदांच्या सेवानिवृती नंतरच्या अडचणीची यादी करणेत आली.तसेच सदर सभेत बहुमताने खालील प्रमाणे पुणे ग्रामीण जिल्हाची व बारामती तालुका पदाधिकाऱ्यांची बहुमताणे सभेत निवड करण्यात आली. 1) पुणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष :-. भाऊसाहेब आंधळकर साहेब 2) कार्यकारीअध्यक्ष :-. विजय महादेव बनकर 3) उपाध्यक्ष :- . रमेश रामचंद्र भोसले व संतोष पी गजभिव व . नाळे4)सचिव. बाळासाहेब महादेव जाधव
5) कोषाध्यक्ष. रविराज पाटोळे6)संपर्कअधिकारी :-. रामदास भिकाजी भोसले 7)समन्वयअधिकारी :- . बापू गणपत लोखंडे
8)सदस्य -सुलतान मेहबूब शेब “बारामती तालुका कार्यकारणी ”
1) तालुका अध्यक्ष :-.सुनिल कृष्णराव बांदल2) उपाध्यक्ष :- . तानाजी दिनकर घोडके 3) सचिव :- . प्रकाश कृष्णाजी गलगले
4) खजिनदार :- . अनिल चंदुलाल जाधव5) सदस्य. मोहन नानासाहेब तावरे व. आत्माराम गंगाराम गावडे व . सोमनाथ पवार. पुणे ग्रामीण व बारामती तालुका पदाधिकारी पदी निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांना राज्याचे सचिव संपतराव जाधव, ऊपाध्यश सोपानराव महांगडे व जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर यांनी शुभेच्छा दिल्या. सभा मोठ्या ऊत्साहात व आनंदात व खेळीमेळीचे वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला