पुणे ग्रामीण दि ०२ :- शरद सहकारी बँक लिमिटेड पुणे या बँकेतील कर्ज स्वरूपामध्ये घेतलेल्या व्यवसाय वाढीसाठी 3 तीन कोटी रुपयांच्या कर्जासाठी गहाण ठेवलेली जमीन परस्पर विकले चा आरोप बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.आरोपी – 1) शैला सुरेश भुजबळ (रा. शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे ता शिरूर जि पुणे ) 2) जयश्री शिवाजी धुमाळ रा. शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे ता शिरूर जि पुणे 3) राजेश शिवाजी धुमाळ रा. शिक्रापूर, तळेगाव रोड, ता शिरूर जि पुणे 4) वेंकट एस. चलसानी रा. 3519, इंदिरा सोसायटी, सैनिक बोर्डवाडी, वडगाव शेरी ता हवेली जि पुणे 5) सुरेश काशिनाथ भुजबळ रा. शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे रोड, ता शिरूर जि पुणे यांनी संगनमत करून तारण म्हणून बॅकेकडे गहाण खताने ठेवलेली सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे येथील जमिन गट नंबर 1011 क्षेत्र 00 हेक्टर 83 आर पैकी 00 हेक्टर 63 आर जमीन तारण ठेवलेली असताना सदर जमीन यापैकी 30 गुंठे गुंठे क्षेत्र असे शरद बॅकेला तारण ठेवलेली जमीन बॅकेला विश्वासात न घेता परस्पर स्वतःच्या फायदयासाठी खरेदीखताने विक्री करून बॅकेचे व खरेदीदाराचे फसवणूक केली असून सदर आरोपी 3) सुरेश काशिनाथ भुजबळ रा. शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे रोड, ता शिरूर जि पुणे यांना सदर जमीन शरद सहकारी बॅक लि, मंचर शाखा शिक्रापूर यांना तारण म्हणून ठेवलेली आहे हे माहित असताना जाणीवपुर्वक फसवणूक करण्याच्या उददेशाने सदर तारण जमिनीतील क्षेत्र खरेदी करून तसेच 1) शैला सुरेश भुजबळ (रा. शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे ता शिरूर जि पुणे ) 2) जयश्री शिवाजी धुमाळ रा. शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे ता शिरूर जि पुणे 3) राजेश शिवाजी धुमाळ रा. शिक्रापूर, तळेगाव रोड, ता शिरूर जि पुणे 4) वेंकट एस. चलसानी रा. 3519, इंदिरा सोसायटी, सैनिक बोर्डवाडी, वडगाव शेरी ता हवेली जि पुणे 5) सुरेश काशिनाथ भुजबळ रा. शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे रोड, ता शिरूर जि पुणे यांनी संगनमत करून बॅकेला विश्वासात घेवून ते कर्ज रक्कम भरणार असलेबाबत विश्वास देवून त्याबद्दल्यात चेक देवून व बॅकेकडून तारण म्हणून ठेवलेल्या जमिनीचे रिलीज डीड दस्त क्रमांक 1360/2019 प्रमाणे दिनांक 02/03/2019 रोजी प्राप्त करून घेवून व त्यानंतर संगनमताने बॅकेचे फसवणूक करण्याच्या उददेशाने बॅकेला दिलेले चेक बांउन्स केले अशा प्रकारे रक्कम रूपये 3,28,58,720/- रूपयेची बॅकेचे सुरूवातीपासून फसवणूक केली आहे. म्हणून सदर फसवणूकीबाबत संबधित पोलीस ठाण्यास तक्रार देवून गुन्हा नोंद करणेकरिता मला शरद सहकारी बॅक लि तर्फे बोर्ड ठरावाप्रमाणे प्राधिकृत सक्षम अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. म्हणून आरोपीविरूध्द कायदेशीर फिर्याद राजाराम मारूती डेरे, (वय 45 वर्ष, व्यवसाय नोकरी, रा. नारायणगाव, माउली हाईटस्, फ्लॅट नं एफ/ओ/5, 4 था मजला ता. जुन्नर, जि. पुणे.) दिली आहे.