पिंपरी चिंचवड दि ०३ :- पिंपरी चिंचवड सामजिक सुरक्षा विभाग पोलिसांनी एक मोठा सेक्स रॅकेटवर छापा टाकून सेक्स रॅकेट उध्वस्त केले आहे. सांगवी पोलिस स्टेशन हद्दीतील ओमकार कॉलनी येथील वक्रतुंड बिल्डींगमध्ये धाड टाकून, पोलिसांनी हा सेक्स रॅकेट उध्दव केला आहे. या धाडीत जवळपास 16 नायजेरियन तरुणींची सामाजिक सुरक्षा विभागाने सुटका केली आहे.व पिंपळे गुरव , सांगवी, पुणे येथे वास्तव्यास असणाऱ्या परकीय नायजेरीयन महिलांकडुन वेश्या व्यवसाय करवुन घेतला जातो अशी खात्री होताच या बाबतची माहिती सामाजिक सुरक्षा
विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक . विठ्ठल कुबडे यांना देऊन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस अधिकारी सपोनि निलेश वाघमारे व पोउपनि धैर्यशिल सोळंके व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन पिंगळे गुरव परिसरातील वक्रतुंड आंगण फेज५ , नावाच्या बिल्डिंगमध्ये मोरया पार्क , गल्ली नं . ३ , पिंपळे गुरव,सांगवी, बिल्डींगमध्ये विदेशी तरुणीच्या माध्यमातून देह विक्रीचा व्यवसाय केला जातो. अशी गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभाग पोलिसांनी मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे डमी कस्टमर बनवून पोलिसांनी ही धाड टाकून हा रॅकेट उद्धव करण्यात आलं आहे.
देह विक्री करणाऱ्या १६ परकीय नायजेरीयन महिलांना ताब्यात घेऊन त्यापैकी १२ पिडीत महिलांची सुटका करण्यात आली . तसेच उर्वरीत ०४ नायजेरीयन महिला आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेविरुध्द कार्यवाही करण्यात आली आहे . सदर कारवाई दरम्यान नमुद ठिकाणी ८२ हजार , ९ २० रु किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन ताब्यातील ०४ नायजेरीयन महिला आरोपी यांचे विरुध्द सांगवी पोलीस स्टेशन येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ भा.द.वि. कलम ३७० ( ३ ) . ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन १२ नायजेरीयन पिडीत महिला यांची वैद्यकीय तपासणी करुन रेस्क्यु फाऊंडेशन हडपसर , पुणे येथे दाखल करण्यात आले आहे . पिडीत व आरोपी महिला यांचेकडील | पासपोर्ट , व्हिसा यांची पडताळणी करण्यात येत असुन पुढील तपास सांगवी पोलीस
स्टेशन करीत आहे . सदरची कामगिरी . पोलीस आयुक्त . कृष्ण प्रकाश ,अप्पर पोलीस आयुक्त , रामनाथ पोकळे , पोलीस उप – आयुक्त , ( गुन्हे ) सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त. प्रेरणा कट्टे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे , सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे , पोलीस उप निरीक्षक धैर्यशिल सोळंके , सपोफौ विजय काबंळे पोहवा . संदिप गवारी , पोहवा संतोष असवले , पोहवा अनंत यादव , पोहवा सुनिल शिरसाठ , पोहवा नितीन लोंढे , पोना महेश बारकुले , पोना दिपक साबळे , पोना अनिल महाजन , पोना विष्णु भारती , पोना अमोल शिंदे , पोना गणेश कारोटे , पोना भगवंता मुठे , पोना मारुती करचुंडे , मपोना संगिता जाधव , मपोना वैष्णवी गावडे , पोशि , मारोतराव जाधव , पोशि राजेश कोकाटे , पोशि योगेश तिडके , मपोशि सोनाली माने व मपोशि योगिनी कचरे तसेच रेस्कयु फाऊंडेशन , हडपसर , पुणे येथील कुमार गुरु थोरे व तनुजा विनायक पवार यांनी कामगिरी केली आहे .