.स्क्रीप्ट दि ०५ :- महागांव येथे दि ५ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टी महागांव येथे महाराष्ट्र शासनाने ७२हजार नागरिकांचे विजबिल कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेवून जवळपास चार कोटी जनतेला अंधारात ठेवण्याचे प्रयत्न केलेआहे.या मध्ये करोना काळतील जनतेचे दरमहा १०० युनिट पर्यंतचे बिज बिल माफ करण्याचे जाहीर करुन स्वत: उर्जामंत्र्यांनी त्या निर्णयावर पाणी फेरले असून करोना काळतील अवाजवी व मनमानी बिल आकारून जनतेची पिळवणूक केली आहे.त्याचा निषेध म्हणून आज विद्युत महावीतरण कार्यालयास भारतीय जनता पार्टी महागांव यांचे कडून विद्युत महावितरणास टाळाठोको आंदोलन करण्यात आले होते.
या वेळी महागांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, विलास चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर विद्युत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता,विनोद चव्हाण यांनी अदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून अदोलन समाप्त केले आहे.या वेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष दीपक आडे, शहर अध्यक्ष डॉ ईरफान कुंदन,विशाल डहाके, सुरेस नरवाडे,बिरबल मुडे,मंचक खदांरे,विश्वनाथ कदम,शेख सलीम,शंकरराव बावणे, नंदू गिरी, यू.मो.शहर अध्यक्ष निलेश नरवाडे,नानाभाऊ काप्रतवार सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यवतमा प्रतिनिधी :- मायाताई सागर पाईकराव