पुणे दि १९ :- पाषाण परिसरात दि१८ रोजी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन कडील सहा.पोलीस निरीक्षक विशाल पवार व स्टाफ असे रात्रगस्त करीत असताना लमांडतांडा पाषाण पुणे परिसरात येथे पेट्रोलिंग करीत असताना एक ब्रेझा कार संशयास्पद फिरताना पोलीसांना दिसली व त्या कारला अडवल्याचा राग आल्याने पोलीसांना अपशब्द वापरून धक्का बुक्की करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या पाच मद्यपी आरोपी नामे १ ) शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर , वय २५ वर्षे रा . ३८ नाना पेठ , डोके तालीम जवळ , पुणे . २ ) साईराज सुनील काकडे , वय २३ वर्षे , रा.गोगावले स्वामी मठ , कमलानेहरु हॉस्पीटल , मंगळवार पेठ , पुणे . ३ ) राहूल सुरेश खेजे , वय -४० वर्षे , रा .७८७ नाना पेठ , पुणे . ४ ) समीर विनोद तांबे , वय ३१ वर्षे , रा .४२७ , मंगळवार पेठ , नरपतगिरी चौक , तांबेवाडा , पुणे . ५ ) शार्दुल प्रमोद ढाके , वय २८ वर्षे , रा . शिंदे नगर , बावधन , पुणे यांना ताब्यात घेवून चौकशी केली आसता , सदरचे आरोपी हे पुणे शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार व आंदेकर टोळीतील सक्रीय सदस्य असून यातील आरोपी क्रमांक १ व ३ यांना या पुर्वी पुणे शहर व परिसरातून तडिपार करण्यात आले होते.तडिपारी संपताच सदरच्या आरोपीनी गुन्हा केला असून सदर सर्व आरोपीविरूध्द चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत . सदरची कारवाई ही मा.पोलीस उप आयुक्त , पंकज देशमुख , परिमंडळ ४ पुणे शहर व.सहा.पोलीस आयुक्त रमेश गलांडे खडकी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक,अनिल शेवाळे, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे सुचनेनसुसार पोलीस निरीक्षक , गुन्हे , दादा गायकवाड ,चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर व स्टाफ यांनी केली आहे . पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक , लक्ष्मण उर्कीडे हे करीत आहेत .