श्रीगोंदा दि २१ प्रतिनिधी : – श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना कुकडी कॅनॉलचे चालु असणारे रोटेशन ९ दिवसाचे आहे. हे वाढवून ते १३ दिवस करण्यात यावे नाहीतर तालुक्यातील ५० टक्के शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागेल.तसेच पुढील आवर्तनाची आवश्यकता असून पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये २ टी.एम.सी. पाणी बंधारे भरणेसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.परंतू पुढील रोटेशनचे पाणी या बंधाऱ्यामध्ये गेल्यास परतचे रोटेशन होऊ शकत नाही.त्यामुळे तालुक्यातील शेतकरी यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होईल.त्यामुळे बंधारे भरण्याचा निर्णय थांबवून पुढील दुसरे रोटेशनचे नियोजन करून ती तारीख जाहीर करण्यात यावी.तसेच कुकडी कॅनॉलवरील डी.वाय १३ व डी.वाय १४ वरील चाऱ्यांची गेट व चाऱ्या दुरूस्त करण्यात यावेत.तसेच युती सरकारच्या काळात डींभा ते माणिकडोह या बोगदा कामास मंजुरी मिळाली असून सुद्धा सदरचे काम चालू होत नाही.तरी डिंभा ते माणिकडोह हा बोगदा काम तातडीने सुरू करणेत यावा या निर्णयामुळे तालुक्याचा वाट्याला २ टी.एम.सी.पाणी वाढवून मिळू शकते व तालुक्याचा फायदा होऊ शकतो.
तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना ऐन सुगीच्या वेळेला शेतीपंपाच्या डी.पी.(ट्रान्सफॉर्मर)बंद करून शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो.प्रत्येक निवडणूक आली की,राज्यातील सर्वपक्षीय पुढारी व पक्ष घोषणा करतात की, विज मोफत देऊ, संपूर्ण कर्जमाफी करू, घोषणा केल्यामुळे शेतकरी वीज बिल भरत नाही. कर्ज भरत नाही त्यामुळे पर्यायाने थकबाकी वाढते. शेतकरी अडचणीत येतो या अडचणी आणणाऱ्या व पक्षातील पुढार्यांवर गुन्हे का दाखल करण्यात येऊ नये.वरील सर्व मागण्यांसाठी दि.२२ फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र भाऊ म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकरी बांधव धरणे आंदोलन करणार आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे