पुणे दि १३ :- औंध परिसरात घरफोडी करून पोलिसांसमोरूनच पसार झालेल्या मुख्य आरोपी सह गुन्हेगाराला पकडण्यास चतुःश्रृंगी पोलिसांना यश आले आहे. हडपसर परीसरात रामटेकडी येथील जंगलात पाठलाग करीत चतुश्रृंगी पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी मोठ्या धाडसाने त्याला पकडले. चोरट्याकडे ब्लेड आणि धारदार शस्त्र असतानाही जिवाची पर्वा न करता पोलीस उप निरीक्षक महेश भोसले , मोहन जाधव , अमलदार दिनेश गडाकुश मुकूद तारू प्रकाश आव्हाड , श्रीकांत वाचवले संतोष जाधव मारम साळवी प्रमोद शिंदे , आशिष निमसे जानेचर मुळे , मारुती पारधी वसिम सिद्दीकी , नेजस चोपडे , अमोल जगताप
पोलिसांनी त्याला अटक पुणे शहरातील विविध पोलिस ठाण्यात त्यावर घरफोडी, वाहनचोरी आणि जबरी चोरीचे सुमारे १०० गुन्हे दाखल आहेत पुणे शहर व जिल्ह्यामध्ये घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार बिरजुसिंग रजपुतसिंग दुधाणी व त्याचे टोळीवर मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर म्हणून पदभार
स्विकारल्यानंतर शहरातील अवैदय धंदे , अवैदय कारवाया तसेच लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन त्यांचे मुसक्या आवळण्याचे धोरण स्विकारले आहे व सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिले आहे व एक इसम वय ४४ वर्षे , धंदा वॉचमन , सध्या रा . शैलेश टॉवर , सिध्दार्थनगर फेज ३ चे बाजुला , औध , पुणे वॉचमन म्हणुन नोकरी करतात . दि . २८/१२/२०२० रोजी पहाटे ०२/४५ वा . चे सुमारास फिर्यादी नेहमीप्रमाणे शैलेश टॉवर सोसायटीचे गेटजवळ डयुटी कामी थांबले असताना एक चारचाकी गाडी फिर्यादीपासुन साधारण १०० मीटर अंतरावर सोसायटीचे रोडवर थांबुन त्यामधुन चार इसम बाहेर आले . तेव्हा सदर इसम गेटजवळ आल्यानंतर फिर्यादी यांनी त्यांना , “ साहब किधर जाना है ” असे विचारले असता त्यांनी फिर्यादी यांना अचानक मारहाण करायला सुरवात करुन फिर्यादीस चाकु दाखवुन , “ गप्प बस नाहीतर तुला खल्लास करु “ असे धमकाविले . त्यातील काळे रंगाचे जॅकेट व काळे रंगाची पॅण्ट घातलेला एक इसम फिर्यादी जवळ चाकु घेवुन थांबुन इतर तीन इसम सोसायटीचे पाय – याने वरती गेले . तेव्हा त्यांचे जवळ हातामध्ये लोखंडी कटवनी , लोखंडी कटर व चाकु होते . त्यानंतर साधारण अर्धा तासा नंतर तीन इसम परत आले तेव्हा त्यातील एका व्यक्तीजवळ एक एल ई डी टी व्ही होता . सदर टी व्ही घेवुन चारही इसम बाहेर जात असताना समोरुन पोलीसांची दुचाकी गाडी येताना पाहुन सदर चारही इसम भरधाव वेगाने त्यांची चारचाकी गाडीमध्ये बसुन निघुन गेले . सदर चार इसमाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे . १. सदर इसमाने लाल व काळ्या रंगाचे जॅकेट व निळया कलरची जिन्स पॅन्ट व तोडाला रुमाल बांधला होता . २. सदर इसमाने पांढरा शर्ट व काळी पॅन्ट व तोंडाला रुमाल बांधला होता . ३. सदर इसमाने काळे रंगाचे जॅकेट व काळे रंगाची पॅण्ट व तोंडाला रुमाल बांधला होता . ४. सदर इसमाने काळे रंगाचे जॅकेट व काळे रंगाची पॅण्ट व तोडाला रुमाल बांधला होता . सदर चारही इसमांचा बांधा मध्यम असुन त्यांचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्ष असावे.अशी तक्रार दिलेवरुन चतुःशृंगी पोलीस स्टेशन येथे दिनांक ०४/०१/२०२१ रोजी गुन्हा दाखल नोंद आहे .सदर गुन्ह्याचा चतुःशृंगी पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तपास करुन नमुद गुन्ह्यात आरोपी नामे बिरजुसिंग रजपुतसिंग दुधानी यास निष्पन्न करुन त्यास अटक करुन इतर त्याचे साथीदार यांना अटक केले आहे . नमुद गुन्ह्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे . ( १ ) बिरजूसिंग रजपुतसिंग दुधाणी , वय ३७ वर्षे , रा रामटेकडी अंध शाळेच्या मागे , हडपसर , पुणे . ( २ ) बिंतुसिंग शामसिंग कल्याणी , वय २४ वर्षे , रा.कोठारी व्हील्स शोरुम शेजारी , रामटेकडी , हडपसर , पुणे ( ३ ) सनीसिंग पापासिंग दुधानी , वय २१ , रा . गल्ली नं . ५ , श्री साई सोसायटी समोर , बिराजदार नगर , हडपसर , पुणे ( ४ ) इतर एक सदर आरोपींना अटक करुन त्यांचेकडे तपास करता त्यांनी टोळी प्रमुख बिरजूसिंग रजपुतसिंग दुधाणी याचे सांगणेवरुन आरोपी यांचेसह
एकत्र येवुन सदरचा गुन्हा केला आहे . दाखल गुन्ह्यास मोका अंतर्गत कारवाई करणेबाबत प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे , चतुःशृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी पंकज देशमुख पोलीस उप आयुक्त परिमंडळ -०४ पुणे यांचे मार्फत नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर यांना सादर केला होता . सदर प्रस्तावाची छाननी केल्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी हे बिरजूसिंग रजपुतसिंग दुधाणी याचे टोळीचे सदस्य म्हणुन काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे . टोळी प्रमुख बिरजूसिंग रजपुतसिंग दुधाणी व त्याचे वर नमुद टोळीचे सदस्य आरोपींनी संघटित रित्या सदरचा गुन्हा केलला आहे . आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी निर्माण करुन एकटयाने व संयुक्तिक रित्या स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करणेकरिता व त्यातुन गैरवाजवी व आर्थिक व इतर फायदा मिळविण्या करिता घरफोडी सारखे गुन्हे केलेले आहेत . सदर संघटित गुन्हेगारी टोळीने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी त्यांचे टोळीच्या अन्य सदस्यांसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा तसेच आपल्या टोळीचे वर्चस्व व दहशत कायम ठेवण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी कृत्य सातत्याने चालु ठेवलेले आहे . टोळीचे वर्चस्व करुन त्यांनी घरफोडी , वाहन चोरी , दरोडा , जबरी चोरी , शासकिय नोकरावर प्राणघातक हल्ला व दहशतीचा वापर करुन मालाविरुध्दचे गंभीर गुन्हेगारी कृत्य आरोपींनी सातत्याने केलेले आहे . सदर आरोपी यांनी संघटित टोळीचे माध्यमातुन गुन्हा केलेला असल्याने दाखल गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा , सन १ ९९९ चे कलम ३ ( १ ) ( ii ) , ३ ( २ ) , ३ ( ४ ) या कलमाचा समावेश करणेबाबत नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग , पुणे शहर यांनी मंजुरी दिलेली आहे .या गुन्ह्यामध्ये मोका कायद्याची कलमे समाविष्ठ करण्यात आलेली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास किशोर जाधव , सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग , पुणे शहर हे करित आहेत . .