पिंपरी चिंचवड दि १९ :- पिंपरी चिंचवड महापालिका उपमहापौरपदासाठी हिराबाई उर्फ नानी घुले यांनी भाजपच्या वतीने अर्ज दाखल केला आहे. त्यावर येत्या मंगळवारी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल.पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी शुक्रवारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. भाजपकडून हिराबाई घुले यांचा नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे अर्ज भरला आहे. महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, नगरसेविका सीमा सावळे, शर्मिला बाबर, नगरसेवक सागर गवळी, सुरेश भोईर आदी उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस कडून पंकज भालेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ, शहर अद्यक्ष संजोग वाघेरे, कार्यअद्यक्ष प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.