कर्जत दि १५ :- दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन फरार अट्टल आरोपीना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.शहादेव उर्फ शहाजी गोकुळ शिरगिरे रा. जामवाडी ता.जामखेड,अक्षय प्रभाकर डाडर रा.पाटेगाव ता.कर्जत अशी अटक केलेल्या फरार आरोपीची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.२२मार्च रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास नगर-सोलापूर महामार्गावर पाटेवाडी शिवारात आरोपीनी एका वाहनाला अडवून ड्राइव्हर ला लुटमारीच्या उद्देशाने मारहाण केली होती.त्यावरून कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि जवान यांनी तात्काळ ठिकाणी पोहोचून संशयित इसमाना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले त्यांचा पाठलाग सुरू केल्यानंतर त्यापैकी शाहूराज बाबासाहेब कोकरे, रा. ता. कर्जत याची गाडी २२० पल्सर सह यास ताब्यात घेतले होते.अटक केलेल्या आरोपीवर जबरी चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत.महामार्गावर गाड्या अडवत असताना दोन आरोपी मिळून आले.त्यांच्यावर दरोड्याच्या तयारीचा गुन्हा गु.र.न 166/2021 IPC 399 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक मनोज पाटील ,अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.चंद्रशेखर यादव,पो.स.ई अमरजीत मोरे, पोलीस जवान वैभव सुपेकर, शाम जाधव, सुनिल खैरे,जितेंद्र सरोदे, महादेव कोहक यांनी केली.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे