• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

खूशखबर ! कर्जत व राशीन मध्ये १७ खासगी लॅबमधून रॅपिड अँटिजेन कोरोना टेस्ट मोफत सुरु

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/05/2021
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

कर्जत दि २७ :- कर्जत व राशीन भागातील नागरिकांना कोरोनाची चाचणी करण्यासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये जावे लागत होते. मात्र, आता या सर्वांसाठी एक चांगली बातमी असून कर्जत व राशीनमध्ये १७ ठिकाणी खासगी लॅब चालकांकडून रॅपिड अँटिजेन कोरोना टेस्ट मोफत केंद्र सुरु करण्यात आले आहे. कर्जत तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत होते. काही नागरिकांच्या चाचण्या होत नव्हत्या. तर अनेकांना या संदर्भात मनस्ताप सहन करावा लागत होता.या अनुषंगाने पोलीस निरीक्षकचंद्रशेखर यादव यांनी सर्व लॅब चालक यांचेशी चर्चा करून रॅपिड टेस्ट करण्यासाठीचे किट आणि मास्क प्रांत अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी संदीप पुंड यांच्या हस्ते लॅब चालकांना देण्यात आले. या सर्व टेस्टसचा डेटा हा तालुका आरोग्य कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. वेळोवेळी प्रशासनाचे प्रतिनिधी सदर ठिकाणी टेस्टिंग वेळी उपस्थित राहणार आहेत.
यामुळे कर्जत व राशीन ग्रामस्थांना कोरोना चाचणी करणे आता सोयीस्कर होणार असून लोकांचा वेळ वाचणार आहे. तसेच गर्दीचे प्रमाण देखील कमी होणार आहे. या टेस्टची सर्व माहिती रोजचे रोज प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांवर लवकर उपचार करता येणार आहेत आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुध्दा करता येणार आहे.या उपक्रमामुळे तालुक्यात जास्तीत जास्त कोरोना टेस्ट होतील व कोरोना संसर्ग हा नियंत्रणात आणण्यास खूप मोठी मदत होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी यापुढे कर्जत येथील १० लॅब व राशीन येथील ७ लॅब मध्ये मोफत रॅपिड एंटीजन चाचणी करून मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी त्या ठिकाणी जाऊन आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.सर्वसामान्य नागरिक हे काही त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जातात. त्यांना काय होतंय याची माहिती देतात. तसेच नागरिक काहीतरी आजार किंवा लक्षणे असल्यास पॅथॉलॉजी लॅब मध्ये वेगवेगळ्या टेस्ट करण्यासाठी जातात. जर या सर्व डॉक्टरांना आणि पॅथॉलॉजी लॅब यांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास कोरोना सदृश्य लक्षणे असलेले नागरिक तात्काळ मिळून येतील आणि त्यांच्या लवकर टेस्ट करून कोरोना असल्यास तात्काळ उपचार करता येतील. हा विचार करून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत येथील १० आणि राशीन येथील ७ पॅथॉलॉजी लॅब चालकांची कर्जत पोलीस स्टेशन तसेच राशीन पोलीस दुरक्षेत्र येथे पोलीस जवान मनोज लातूरकर, गोवर्धन कदम, गणेश भागडे यांच्या मदतीने मीटिंग बोलावली. जास्तीत जास्त लोकांच्या टेस्ट केल्यास कसा फायदा होईल, नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यासाठी कशी सोय करणे आवश्यक आहे.याबाबत चर्चा केली. प्रशासन रॅपिड अँटीजन किट,मास्क आणि हॅन्ड ग्लोज उपलब्ध करून देतील आपण टेस्ट करा अशा आवाहनावरून हे १७ लॅब चालक आता विनामूल्य कोरोना टेस्ट करण्यासाठी तयार झाले आहेत. या बाबत डॉक्टरांना सुद्धा आपण पेशंट आला की त्याची लॅब मध्ये कोरोना टेस्ट करावी असे सांगण्यात आले आहे.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

अवैध दारूविक्री व गुन्हेगारी थांबविण्यासाठी दारूबंदी उठविण्याचा निर्णय

Next Post

लॉकडाऊन नंतर पर्यटकांच्या सेवेसाठी MTDC ने कंबर कसली, कर्मचाऱ्यांना आदरातिथ्य आणि कोरोना बाबतचं अत्याधुनिक प्रशिक्षण

Next Post

लॉकडाऊन नंतर पर्यटकांच्या सेवेसाठी MTDC ने कंबर कसली, कर्मचाऱ्यांना आदरातिथ्य आणि कोरोना बाबतचं अत्याधुनिक प्रशिक्षण

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist